Viral Video : लग्नानंतर मुलीचे आयुष्य बदलते. आईवडीलांचे घर सोडून मुलीला पतीच्या घरी म्हणजेच सासरी यावे लागते. लग्नानंतर नवीन घरात नवीन माणसं भेटतात. पतीसह सासू, सासरे, दीर, नणंद, जाऊ बाई, इत्यादी लोकांबरोबर नातं निभावावं लागतं. या सर्व लोकांमध्ये सुनेचा सर्वात जास्त संपर्क हा सासूबाईबरोबर येतो. प्रत्येक मुलीला वाटतं की लग्नानंतर आपल्याला चांगली सासू मिळावी. टिव्ही मालिका, चित्रपटात सासू सुनेच्या नात्यातील वाद, भांडणं दाखवली जातात. प्रत्यक्ष आयुष्यात अनेक घरोघरी ही कहाणी दिसून येते.
सासू सुनेच्या नात्यातील कटुपणा दूर व्हावा, यासाठी एका युवा समाज प्रबोधनकाराने प्रयत्न केला. त्याने एक कार्यक्रमात चक्क सासू सुनांना एकमेकांना मिठी मारण्यास सांगितले आहे. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
सुनबाईंची सासूबाईंना कडकडून मिठी
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक मोठा मंडप दिसेल. या मंडपात असंख्य महिला दिसत आहे. कदाचित हा एखादा सार्वजनिक कार्यक्रम असावा. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की युवा समाज प्रबोधनकार वसंत हंकारे सर्व सासू सुनेला एकमेकांना मिठी मारण्यास सांगत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की असंख्य सासू सुना एकमेकांना मिठी मारत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. या व्हिडीओत तुम्हाला प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावर हास्य दिसेल.
हेही वाचा : “अपघातात वडील वारले अन्…” चिमुकल्याने सांगितली व्यथा; विद्यार्थ्यांसह शिक्षकही रडले, पाहा VIRAL VIDEO
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
vasant_hankare_3232 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “शेकडो सुनांनी कडकडून मिठी मारली आपल्या सासूबाईला…” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “लहान सहान गोष्टींवरून भांडण करण्यापेक्षा एकमेकांची मन जपली की आयुष्य सुंदर जगता येतं आपल्या बरोबर १०० टक्के” तर एका युजरने लिहिलेय, “सरांचे मनापासून आभार… मार्गदर्शन खुपच असते पण बोली भाषा च मनाला लागते” आणखी एका युजरने लिहिलेय, “सासू कधी आई होऊ शकत नाही आणि सुन कधी मुलगी होऊ शकत नाही. हे तुमच्या आमच्या समोर देखाव्याचं सोंग करणार बाकी काही नाही. कुत्र्याची शेपटी वाकळी ती वाकळीच असणार.” एक युजर लिहितो, “प्रेम कसं हे मनापासून असावे. कुणी सांगतंय म्हणून दिखाव्यापूरत प्रेम नसावं.” तर एक युजर लिहितो, “असं पहिल्यांदा बघितलं एक नंबर सर आपले आभार मानतो सर. हे ऐक नंबर केलं असंच चाललं पाहिजे असं नेहमी चाललंय पाहिजे” अनेक युजर्सनी अशा कृतीचे आभार मानले आहे.