प्रत्येक घरात सासू-सुनेचे किस्से ऐकायला मिळतातच काही प्रेमाचे असतात तर काही भांडणाचे. सासू-सून ही फक्त घरापुरती मर्यादित राहिली नाही म्हणजे ती पडद्यावरही आली. टीव्ही सीरिअल, फिल्म यामध्ये सासू-सुनेचं नातं दाखवलं जातं. जे पाहायला अनेकांना आवडतं. आतापर्यंत तुम्ही सासू-सुनेचे असे ड्रामे, भांडणं पाहिले असतील.असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये सुनेने चक्क सासूला बेदम मारलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

सुनेची सासूला बेदम मारहाण

खरं तर, व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आजीने नातवाला खोडसाळपणे मारहाण केल्याचे दिसत आहे. यानंतर मुलाला वाचवण्यासाठी आलेल्या सूनेलाही सासू ओरडू लागते आणि याच दरम्यान सासू सुनेच्या कानाखाली वाजवते. यानंतर रागावलेली सुनही सासूला बेदम मारते. यावेळी हा व्हिडीओ शूट करणारा व्यक्ती हा आपल्या बायकोलाच दोष देताना दिसत आहे. ही माझ्या आईला मारते असे तो बोलत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video: लग्नाची विधी सुरु असतानाच वऱ्हाडी नवरीच्या अंगावर, एका कपड्यासाठी नवरदेवासमोरच…

सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून आतापर्यंत या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Story img Loader