आजपर्यंत आपण रोमिओ-ज्युलिएट, हिर-रांझा यांच्यासारख्या प्रेमवीरांच्या अनेक कथा आणि किस्से ऐकले असतील. आपल्या प्रेमासाठी त्यांनी केलेला पराकोटीचा त्याग भावी प्रेमवीरांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरत आला आहे. आता हेच बघा ना! एखाद्या श्रीमंत कुटुंबात जन्माला येणे हे नक्कीच आपल्या हातात नसते. त्यामुळे या श्रीमंतीचेही काही वाटेनासे होते. तुमच्यासाठी खासगी विमान असणे, जगातील तीन खंडांमध्ये तुमचे घर असणे, २४ तास तुमच्यासाठी असणारी सुरक्षायंत्रणा अशा घरात जन्माला येणे म्हणजे नशीबच. मात्र आपल्या प्रेमासाठी तिने या सगळ्या गोष्टींचा त्याग केला असून त्यावर पाणी सोडले आहे.
प्रेमासाठी कायपण…
मलेशियामधील एका तरुणीने आपल्या प्रियकरासह लग्न करण्यासाठी तब्बल २४८४ कोटींच्या संपत्तीचा वारसा सोडला आहे. मलेशियातील सर्वात श्रीमंत आणि प्रतिष्ठित कुटुंबातील अँजेलिन फ्रान्सिसची ही प्रेमकथा आहे. अँजेलिनाचे वडील हे प्रसिद्ध उद्योजक आहेत. त्यांनी अँजेलिनला प्रियकर किंवा संपत्ती यापैकी एकाची निवड करण्यास सांगितलं होतं. पण अँजेलिनासाठी हा फार कठीण प्रश्न नव्हता. कारण तिच्यासाठी प्रेमच सर्व काही होतं. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असताना अँजेलिनाची भेट जेदिडिया फ्रान्सिसशी झाली. आपली प्रेमकथा फार विलक्षण असल्याचं हे जोडपं सांगतं. पण जेदिडिया फार श्रीमंत नसल्याने तो आपली आर्थिक बरोबरी करु शकत नाही असं सांगत अँजेलिनच्या वडिलांनी नाराजी व्यक्त केली होती. जेव्हा या जोडप्याने आपलं प्रेम व्यक्त केलं आणि एकत्र राहण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा अँजेलनिच्या वडिलांनी त्यांना अल्टीमेटम जारी केला. एकतर वारसा हक्कांचा त्याग कर किंवा हे नातं संपवं असा पर्याय त्यांनी मुलीला दिला. यानंतर अँजेलिन फ्रान्सिसने प्रेमाची निवड केली आणि तिच्या कुटुंबाचा समृद्ध वारसा मागे सोडला.
३० कोटी डॉलर्सची मालमत्ता
मलेशियामधील अँजेलिन फ्रान्सिस खू हिने आपल्या प्रियकराशी लग्न करण्यासाठी स्वत:च्या ऐश्वर्यसंपन्न आयुष्याचा त्याग केला. तायकून काय पेंग या तिच्या पित्याने लग्नाला नापसंती दर्शविल्याने तिने त्यांच्या विरोधात जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. पेंग हे साधेसुधे कोणी नसून मलायन युनायटेड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आहेत. ही एक मोठी गुंतवणूक कंपनी असून अमेरिकेतील लॉरा अॅशली या एका बड्या लाईफस्टाईल कंपनीचेही ते भागधारक आहेत. मलेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून त्यांची ओळख असून फोर्ब्जच्या यादीनुसार त्यांची मालमत्ता ३० कोटी डॉलर्स इतकी आहे.
हेही वाचा – बनारसच्या ट्रॅफिकमध्ये अडकली एक्सप्रेस; वाट बघून ड्रायव्हरला आला राग अन्…VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
त्यांच्या या लग्नसमारंभाला ३० जण उपस्थित होते. मात्र तिच्या घरुन या सोहळ्यासाठी कोणीच उपस्थित नव्हते. तिचा संघर्ष इथेच संपला नाही तर लग्नानंतर तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाल्याने तिथेही तिला उपस्थित राहावे लागले. एकूण चार भावंडांमध्ये तीच त्याठिकाणी उपस्थित होती. ही केस इंग्लंडमधील कोर्टातच सुरु होती. त्यामुळे आपल्या लग्नानंतर आपल्या आई-वडिलांचा घटस्फोट होणे तिच्यासाठी अतिशय वाईट होते. कालांतराने काहीशी सेटल झाल्यानंतर तिने फॅशन डिझायनर म्हणून आपला बिझनेस सुरु केला.