आपल्या कुटुंबासाठी वडील म्हणून प्रत्येक पुरुष जीवाचं रान करत असतो, आपल्या कुटुंबाला कसलीही कमी पडू देत नाही. त्यांना काय हवं नको ते सर्व काही न मागता देतो. मुलांच्या यशामध्ये वडिलांचा आनंद असतो. पण वडीलांच्या यशामध्ये आनंदी होणारी लेक तुम्ही क्वचितच पाहिली असेल? सध्या अशाच एका लेकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफानव्हायरल होत आहे. हृदयस्पर्शी व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.
वडील आणि मुलीचं नातं खूप खास असतं. लेक म्हणजे वडीलांच्या काळजाचा तुकडा असते कारण सर्वात जास्त प्रेम तो तिच्यावरच करतो. लेकीसाठी वडील म्हणजे तिच्या आयुष्याचा हिरो असतो जो तिच्यावर आपलं संपूर्ण आयुष्य हसत हसत ओवाळून टाकतो. हे वडील आणि लेकींच सुंदर नातं दर्शवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडीओमध्ये हा एका डिलिव्हरी बॉयचा आहे ज्याला स्विगी या कंपनीत नवी नोकरी मिळाली आहे. हा व्यक्ती आपल्या नवीन नोकरी मिळाल्याचा आनंद आपल्या लेकीबरोबर साजरा करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये दिसते की, एक चिमुकली डोळ्यावर हात ठेवून उभी आहे त्यानंतर तिचे वडील स्विगीचा टीशर्ट हातात धरतो. ज्या क्षणी मुलगी डोळे उघडून हे पाहते तेव्बा तिला खूप आनंद होतो आणि उड्या मारत ती मुलगी आपल्या वडीलांना मिठी मारते. चिमुकली पुन्हा एकदा वडीलांकडे पाहते आणि पुन्हा त्यांना मिठी मारते. वडील आणि लेकीचा आनंद पाहून नेटकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे.
हेही वाचा – “नाद करा ओ पण, पुणेकरांचा कुठे? पुणेरी काकांचा हटके जुगाड पाहून पोट धरून हसाल, पाहा Viral Video
व्हिडिओ इंस्टाग्रामच्या lay_bhari_official पेजवर पोस्ट केला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना सोशल मीडियावर पाहिलेला आजचा सर्वात हृदयस्पर्शी व्हिडिओ असे कॅप्शन दिले आहे. तसेच बाबाला नवीन नोकरी लागला हे पाहून मुलीला किती आनंद झाला बघा असा मजूकरही व्हिडीओच्या कमेंटमध्ये लिहिले आहे.
नेटकऱ्यांना व्हिडिओ खूप आवडला आह. एकाने कमेंट केली की, “प्रत्येकासाठी आयुष्य सारखं नसतं.”
दुसऱ्याने कमेंट केली, “भारी”