London: राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. यावेळी राणीला श्रद्धांजली वाहण्यासाठी एक दिग्गज खेळाडू रांगेत उभा होता. इंग्लंडचा माजी फुटबॉल कर्णधार डेव्हिड बेकहॅमही शुक्रवारी ब्रिटनच्या राणीला आदरांजली वाहण्यासाठी पोहोचला. यासाठी तो लंडनमध्ये लांबच लांब रांगेत उभा असल्याचे दिसले.
संख्या जास्त झाल्यानंतर तात्पुरती रांग थांबवण्यात आली
एलिझाबेथ यांच्या निधनाने देशभरात हळहळ व्यक्त होत आहे. रात्री उशिरापर्यंत तासनतास रांगेत उभे राहून लोक राणीला श्रद्धांजली वाहत आहेत. यूकेमध्ये दहा दिवसांचा राष्ट्रीय शोक आहे. राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यावर सोमवारी लंडनमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत. राणीचे वयाच्या ९६ व्या वर्षी स्कॉटलंडमध्ये निधन झाले. राणीला श्रद्धांजली वाहण्यासाठी शुक्रवारी गर्दी जास्त झाल्यानंतर सरकारने रांगा वाढण्यापासून रोखले आहे. सरकारच्या प्रवक्त्याni सांगितले की, जे लोक थेम्सच्या काठावर उभे होते त्यांनाच पुढे पाठवले जात आहे.
( हे ही वाचा: बिबट्याने केली अजगरावर हल्ला करण्याची चूक; काही क्षणात बदलला मृत्यूचा खेळ, पहा थरारक Video)
राणीला श्रद्धांजली वाहण्यासाठी रांगेत उभे असलेले डेव्हिड बेकहॅम
इंग्लंडच्या फुटबॉल संघाचा माजी कर्णधार डेव्हिड बेकहॅम राणीला श्रद्धांजली वाहण्यासाठी रांगेत उभा आहे. तो काळी टोपी, सूट आणि टायमध्ये आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, मी खूप भाग्यवान आहे की मला माझ्या आयुष्यात असे क्षण मिळू शकले. हा एक दुःखाचा दिवस आहे, परंतु लक्षात ठेवण्याचा दिवस आहे. बेकहॅमने सांगितले की तो पहाटेपासूनच रांगेत उभा होता जेणेकरून कोणीही त्याला ओळखू नये, परंतु त्याची योजना अयशस्वी झाली.
( हे ही वाचा: झोपलेल्या सिंहणीची सिंहाने काढली छेड; मग असं काही घडलं, ज्याने जंगलाचा राजा पूरता हादरला, पहा Video)
राणीची आठवण करून बेकहॅम भावूक झाला
माजी फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमने राणीची आठवण काढली आणि सांगितले की तिला भेटणे हा त्याच्यासाठी अविस्मरणीय क्षण होता. पण आजचा दिवस खूप दुःखाचा आहे. या माजी फुटबॉलपटूने सांगितले की, जेव्हा जेव्हा इंग्लंडच्या सामन्यांमध्ये राष्ट्रगीत वाजवले जाते तेव्हा ते विशेष असते. त्यांनी सांगितले की आम्ही प्रत्येक वेळी थ्री लायन शर्ट घालायचो. माझ्या हाताची पट्टी असायची आणि आम्ही गॉड सेव्ह अवर क्वीन हे गाणे गायले, ते आमच्यासाठी खूप महत्त्वाचे होते.