IND vs AUS David Warner Jai Shree Ram: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याचा पराभव जिव्हारी लागला असला तरी या सामन्यातील व्हिडीओ फोटो, काही मीम्स पोस्ट शेअर करणं काही नेटकऱ्यांनी थांबवलेलं नाही. असाच एक भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे लाइटहाऊस जर्नलिझमला लक्षात आले. या व्हिडिओमध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेटर डेव्हिड वॉर्नर सामन्यादरम्यान मैदानावर दिसत होता. तर प्रेक्षकांमधून ‘जय श्री राम’ च्या घोषणा दिल्या जात होत्या वॉर्नरचा धर्माशी काहीही संबंध नसतानाही लोकांनी जय श्री रामच्या घोषणा दिल्या पण डेव्हिड वॉर्नरने शांत राहून यांना उत्तर दिलं असा दावा या व्हिडिओसह केला जात होता. दरम्यान या व्हिडिओमधील काही गोष्टी या मूळ घटनेच्या परस्पर विरोधी असल्याचे लक्षात आले आहे. नेमक्या या व्हिडिओचा प्रकरण काय हे आपण जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय होत आहे व्हायरल?

ट्विटर यूजर savvy ने व्हायरल विडिओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.

हाच व्हिडिओ इतर वापरकर्त्यांनी देखील समान दाव्यांसह शेअर केला होता.

तपास:

आम्ही InVid टूलमध्ये व्हिडिओ अपलोड करून आमची तपासणी सुरू केली. आम्हाला त्यातून अनेक स्क्रीन ग्रॅब्स मिळाले. पहिल्या कीफ्रेमवर गूगल रिव्हर्स इमेज सर्च वापरले असता, आम्हाला एक YouTube शॉर्ट मिळाला, जिथे लोक ‘पुष्पा’ असे ओरडताना ऐकू आले.

त्यानंतर आम्ही ‘डेव्हिड वॉर्नर, पुष्पा’ हे किवर्ड वापरून गूगल कीवर्ड सर्च केले.

आम्हाला एका महिन्यापूर्वी स्पोर्ट्स टाइम हिंदी या युट्युब चॅनेलवर अपलोड केलेला व्हिडिओ आढळला होता, ज्यामध्ये असे म्हटले होते की क्रिकेटरने पुष्पा चित्रपटातील अभिनेता अल्लू अर्जुन श्रीवल्लीच्या प्रसिद्ध गाण्यातील प्रसिद्ध सिग्नेचर स्टेप केली आहे.

आम्हाला असे अनेक व्हिडिओ देखील सापडले.

X वर कीवर्ड सर्च करताना, आम्हाला त्याच संदर्भात एक पोस्ट देखील आढळली

यापूर्वी डेव्हिड वॉर्नर याने आपल्या लेकीबरोबर सुद्धा पुष्पाच्या डायलॉगवर व्हिडीओ बनवला होता.

https://www.aajtak.in/sports/cricket/story/david-warner-video-on-pushpa-film-of-allu-arjun-movie-david-warner-in-ipl-2022-mega-auction-tspo-1401622-2022-01-29

निष्कर्ष: जय श्री रामच्या घोषात ऑस्ट्रेलियन क्रिकेटर फिल्डिंग करतानाचा व्हायरल व्हिडिओ एडिट केलेला आहे. त्याऐवजी लोक त्याला अल्लू अर्जुनच्या पुष्पा चित्रपटातून एक स्टेप करण्यासाठी प्रोत्साहित करत होते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: David warner teased by indians at ind vs aus chanting jay shree ram australian star reaction is gold goes viral know facts svs