Dawood Ibrahim Hospitalized in Karachi: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग झाल्याच्या वृत्ताने आज सकाळपासून आंतरराष्ट्रीय राजकारणात आणि सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. भारत-पाकिस्तान संबंध ताणले गेल्याच्या अनेक कारणांमध्ये दाऊद इब्राहिमला पाकिस्तानकडून देण्यात आलेला आश्रय हेही एक महत्त्वाचं कारण ठरलं आहे. मात्र, एकीकडे दाऊद इब्राहिम आपल्या देशात नसल्याचाच दावा पाकिस्ताननं कायम केला असताना आता दाऊदवर पाकिस्तानमध्येच विषप्रयोग झाल्याच्या वृत्तामुळे पाकिस्तानचीच पंचाईत झाल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर आता सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडल्याचं दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दाऊद इब्राहिमवर कराचीत उपचार?

पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांकडून दाऊद इब्राहिमवर पाकिस्तानमध्ये विषप्रयोग झाला असून त्याच्यावर कराचीतील एका रुग्णालयात उपचार चालू असल्याचं वृत्त देण्यात येत आहे. शिवाय, दाऊद इब्राहिमची प्रकृती चिंताजनक असून रुग्णालयातील त्याच्या मजल्यावर फक्त तो एकटाच रुग्ण ठेवल्याचाही दावा केला जात आहे. या मजल्यावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमधील इंटरनेट व्यवस्था बंद करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पकिस्तानमध्ये या सर्व घडामोडी घडत असताना दुसरीकडे सोशल मीडियावर मात्र मीम्सला उधाण आलं आहे.

Dawood Ibrahim: “दाऊदवर विषप्रयोगाच्या वृत्तामुळे पाकिस्तानची पंचाईत, आता पितळ उघडं…”, उज्ज्वल निकम यांची सूचक प्रतिक्रिया!

काहींनी दाऊदला विष देणाऱ्या अज्ञात व्यक्तींचे आभार मानले आहेत…

काहींनी अज्ञात व्यक्तींमार्फत भारतविरोधी शक्तींना लक्ष्य केलं जात असल्याची पोस्ट शेअर केली आहे…

काही युजर्सनी दाऊदची प्रकृती गंभीर झाली म्हणून Animal चित्रपटातील बॉबी देओलच्या व्यक्तिरेखेचा नाचतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

एका युजरने या बातमीसंदर्भात परेश रावल व राजपाल यादव यांच्या एका चित्रपटातील विनोदी प्रसंगाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे!

काहींनी दाऊद इब्राहिमच्या मृत्यूच्या बातम्या दर काही वर्षांनी कशा येतात, यासंदर्भातलं एक मीम शेअर केलं आहे.

काही युजर्सनी सूर्यवंशम चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी विष मिसळलेली खीर खाल्ल्यानंतरच्या प्रसंगाचं मीम शेअर केलं आहे.

पाकिस्तानची पंचाईत?

दरम्यान, दाऊद इब्राहिमवरील विषप्रयोगाच्या बातमीमुळे पाकिस्तानची पंचाईत झाल्याची प्रतिक्रिया विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली आहे. “हे वृत्त बाहेर आल्यानंतर पाकिस्ताननं देशभरातील इंटरनेट सेवा बंद केली आहे. काहीतरी लपवायचं असेल, तेव्हाच पाकिस्तानकडून असं केलं जातं. दाऊद आमच्याकडे नाहीच, असाच कायम दावा करणाऱ्या पाकिस्तानची या वृत्तामुळे पंचाईत झाली आहे”, असं ते म्हणाले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dawood ibrahim poisoned in pakistan admitted karachi hospital memes viral on social media pmw