अनेकदा लोक आपल्या जोडीदारासोबत वीकेंडला हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये मस्त डिनरचा प्लॅन करतात. आठवडाभराच्या कामाने आलेला ताण घालवण्यासाठी तिथेल वातावरणाचा आनंद लुटत ते जेवणाचा आस्वाद घेत असतात. शिवाय ते मुद्दाम महागड्या हॉटेल्समध्ये जातात, त्याचं कारण म्हणजे, तिथे जेवण बनवताना स्वच्छतेकडे चांगल्या प्रकारे लक्ष दिले जाते, त्यामुळे ते अशा हॉलेल्समध्ये जात असतात. पण जर तुम्ही तुमच्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये गेलात आणि तुम्ही मागवलेल्या पदार्थामध्ये तुम्हाला मेलेला उंदीर आढळला तर? तर तुम्ही संतापून जाल यात शंका नाही.

सध्या अशीच एक धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये एका जेवणाच्या डीशमध्ये मेलेला उंदीर आढळला आहे. जेवणात साधी माशी पडली तरी लोकांची जेवायची इच्छा मरुन जाते. अशात जर आपल्या जेवणात मेलेला उंदीर आढळला तर आपण काय करु? याचा विचार न केलेलाच बरा, पण सध्या अमेरिकेतील मॅनहॅटनमधील गामिओक या कोरियाटाऊन रेस्टॉरंटमधील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

mhada documents eaten by rats loksatta
म्हाडाच्या संक्रमण शिबिरार्थींची हजारो कागदपत्रे वाळवी, उंदरांनी केली फस्त
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Mother making reels while holding baby in building open terrace shocking video goes viral
एका रीलसाठी आईनं हद्दच पार केली; पोटच्या लेकराला बिल्डिंगच्या टोकावर बसवलं अन्…काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल
Shocking video a four year old girl suffered injuries after stray dogs attacked her at Hyderabad
“बापरे किती वेदना झाल्या असतील तिला” चिमुकलीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; लचके तोडले, फरपटत नेलं अन् शेवटी…थरारक VIDEO व्हायरल
Shocking video Sheep Killed A Leopard On Snow Mountain Animal Video goes Viral on social media
शिकारीच झाला शिकार! मेंढीनं केली खतरनाक बिबट्याची शिकार, मरता मरता ५ सेकंदात फिरवला गेम; Video पाहून अंगावर येईल काटा
women crafting paper stars during her stay in a mental hospital
हस्तकलेनी दिली जगण्याची उभारी! मानसिक रुग्णालयात वेदनेचे कलेत झाले रुपांतर; पाहा व्हायरल VIDEO
young bachelors planning to make chicken
Video : चिकनचा बेत आखला अन् ऐनवेळी गॅस गेला, तरुणांनी केला भन्नाट असा जुगाड
Viral Video
Viral Video : सापाबरोबर Reel बनवणं भोवलं! थेट नाकालाच डसला, Video होतोय व्हायरल

हेही पाहा- पार्टीतील तो डान्स अखेरचा ठरला; हृदयविकाराचा झटका आला अन्…, घटनेचे CCTV फुटेज व्हायरल

या रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी गेलेल्या दोन ग्राहकांनी असा दावा केला आहे की, त्यांनी ऑर्डर केलेल्या सूपमध्ये त्यांना मेलेला उंदीर सापडला आहे. शिवाय त्यांनी या घटनेबाबत रेस्टॉरंटवर खटलाही दाखल केला आहे. त्यामुळे ते हॉटेल सध्या बंद करण्यात आले आहे. युनिस एल. ली नावाच्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवरून काही फोटो आणि व्हिडिओ शेअर करून, त्यांनी गॅमिओक रेस्टॉरंटमध्ये ऑर्डर केलेल्या जेवणात एक अनोखी गोष्ट आढळल्याची माहिती दिली आहे. इंस्टाग्रामवरील फोटो आणि व्हिडिओमध्ये ज्या वाटीमधून त्यांना सूप दिलं होतं त्यामध्ये उंदीर आढळला. शिवाय ते पाहून आम्हाला उलट्याही झाल्याचं ली याने म्हटलं आहे.

हेही पाहा- स्टेशनवरील LED स्क्रिनवर अचानक पॉर्न Video चालू झाला अन्…, रेल्वेचा भोंगळ कारभार; प्रवाशांची शरमेने झुकली मान

रेस्टॉरंटकडून स्पष्टीकरण –

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तर या सर्व घटनेनंतर रेस्टॉरंटने एक व्हिडिओही शेअर केला आहे. ज्यामध्ये स्वयंपाकघरात काम करणारा शेफ दिसत आहेत. जे अतिशय स्वच्छेतेमध्ये काम करताना दिसत आहेत. त्याच वेळी, रेस्टॉरंटचे म्हणणे आहे की, उबेर ईट्सच्या माध्यमातून त्या जोडप्याला जेवण पोहोचवले होते. त्यांच्या जेवणात उंदीर आढळून आल्यावर त्यांनी तो रेस्टॉरंटमध्ये आणून दाखवला, पण आम्हाला असं काहीही आढळलं नाही.

Story img Loader