लुधियाना येथील ढाब्यावर जेवणात एक मेलेला उंदीर आढळून आल्याचा आरोप करण्यात आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून ज्या कुटुंबाने डिश ऑर्डर केली होती त्यांनीच हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर अपलोड केला. लुधियाना शहर पोलिसांनी मंगळवारी लुधियानाच्या फील्ड गंज भागातील प्रेम नगर येथील रहिवासी विवेक कुमार यांच्या तक्रारीवरून या ढाब्याच्या मालकाविरुद्ध एफआयआर नोंदविल. कुमार यांनी सांगितले की,” ते आणि त्याचे कुटुंब रविवारी रात्री उशिरा विश्वकर्मा चौकाजवळील प्रकाश ढाब्यावर गेले होते जेथे त्यांनी चिकन ऑर्डर केले होते. त्यांनी ऑर्डर केलेल्या जेवणात त्यांना मेलेला उंदीर आढळल्याना नंतर त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला त्रास होत असल्याचे जाणवले.”

लुधियानाच्या प्रसिद्ध ढाब्याच्या जेवणात सापडला मेलेला उंदीर

या घटनेचा व्हिडिओ पटकन व्हायरल झाला आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोकांचे लक्ष वेधून घेतले. ही घटना लुधियानाच्या प्रसिद्ध प्रकाश ढाब्यावर घडली आहे. या कुटुंबाला एका नॉन व्हेज डीश म्हणजेच चिकन करीमध्ये ग्रेव्हीमध्ये मेलेला उंदीर दिसला.

Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
tiger seen sitting on elephant shocking video viral
भयंकर घटना! वाघाला पकडून हत्तीवर बांधले अन् पुढे केलं असं काही की…, धक्कादायक VIDEO पाहून लोकांचा राग अनावर
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
tiger attack on cow
VIDEO: शिकार करो या शिकार बनो! ताडोबामध्ये वाघानं पर्यटकांसमोरच केला गायीवर हल्ला; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल
Penguin politely waits for couple
माणसांपेक्षा प्राण्यांना जास्त कळतं? वाटेतून जोडपं बाजूला झालं अन्… पाहा पेंग्विनचा ‘हा’ Viral Video
How To Get Rid Of Rats In House
घरात उंदरांचा सुळसुळाट वाढत चाललाय? फक्त एका सोप्या उपायाने उंदरांना लावा पळवून

कुमार यांनी सांगितले की,”त्यांनी त्या चिकन करी खाल्ल्यानंतर त्यांना काहीतरी चुकीचे असल्याचे जाणवले. तपासणी केली असता त्यात मेलेला उंदीर आढळून आला. त्यांनी आरोप केला की, जेव्हा त्यांनी हे ढाब्याच्या मालकाला सांगितले तेव्हा तो त्यांच्याशी असभ्यपणे बोलला आणि धमकी दिली. त्यानंतर त्यांनी या घटनेचा व्हिडिओ करून सोशल मीडियावर अपलोड केला. ते पुढे म्हणाले की, ”चिकन करी खाल्ल्यानंतर मला आणि त्यांच्या कुटुंबाला अस्वस्थ वाटत होते.” पण ढाब्याच्या मालकाने या आरोप नाकारले आणि सांगितले की ग्राहकाने त्यांच्या ढाब्याचे नाव खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत.

हेही वाचा – दिल्ली मेट्रोत भोलेनाथच्या गाण्यावर नाचताना दिसले कावड यात्रेकरू, Viral Video पाहून नेटकरी म्हणाले…

व्हायरल व्हिडीओमध्ये काय आहे?

व्हिडिओमध्ये एक व्यक्ती टेबलवर ठेवलेल्या विविध खाद्यपदार्थांचे प्रदर्शन करताना दिसत आहे. त्यानंतर कॅमेरा संबंधित डिशवर झूम इन करतो, जिथे व्यक्ती मेलेला उंदीर काढण्यासाठी चमचा वापरते. केवळ 31 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये उंदराची शेपटीही दाखवण्यात आली आहे.

पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “प्रकाश ढाबा लुधियाना. भारतात चिकन करीमध्ये उंदीर. ढाब्याच्या मालकाने फूड इन्स्पेक्टरला लाच दिली आणि ते पळून गेले? अनेक भारतीय रेस्टॉरंटच्या किचनमध्ये अन्नाचा दर्जा खूपच खराब आहे. सावधगिरी बाळगा.”

लुधियानामध्ये चिकन करीमध्ये मेलेल्या उंदराचे प्रकरण इंटरनेटवर व्हायरल

हे फुटेज पाहून इंटरनेटवरील अनेकांना धक्का बसला आहे. रेस्टॉरंटच्या निष्काळजीपणाबद्दल त्यांनी टीका केली. एकाने सांगितले की, “आरोग्य अधिकाऱ्यांनी या प्रकरणाला कठोरपणे हाताळले पाहिजे.” दुसरा म्हणाला, “ज्यांनी ग्रेव्ही खाल्ले त्या सर्वांवर दया करा. हे थेट ग्राहक न्यायालयाचे प्रकरण आहे. काही वर्षांत मोठ्या दंडाची अपेक्षा केली जाऊ शकते.” तिसऱ्याने सांगितले की, “या रेस्टॉरंटचा परवाना रद्द करण्यात यावा,” तर चौथ्याने सांगितले, “रेस्टॉरंटचे नाव एलएफसी लुधियाना फ्राइड रॅट असावे.” आणखी एकजणाने सांगितले की, “लुधियानामध्ये हे काही नवीन प्रकरण नाही. इथे मालक पूर्णपणे खोटे बोलत आहेत. लुधियानामध्ये इतरही अनेक प्रसिद्ध रेस्टॉरंट आहेत जिथे उंदीर दिसतात.”

हेही वाचा – विदेशी फ्रेंड्सचा देशी अवतार! FRIENDS भारतात शूट झाली असती तर? भारतीय लग्नात कसे दिसले असते सर्व पात्र; पाहा AI फोटो

दरम्यान, ढाब्याच्या मालकाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ देखील जारी केला आहे ज्यामध्ये असे म्हटले आहे की, ”काही महिन्यांपूर्वी त्याच ग्राहकाने त्यांच्या मॅनेजरबरोबर वाद घातला होता जेव्हा त्यांनी बिलावर सूट नाकारली होती. त्याने ढाब्याची बदनामी करण्याची धमकी दिली होती त्यामुळे त्याने कट रचून हा व्हिडिओ केला.” असे मालकाने सांगितले.

आयपीसीच्या कलम २७३ (हानीकारक अन्न किंवा पेयाची विक्री) आणि २६९ (निष्काळजीपणाने जीवाला धोकादायक रोगाचा संसर्ग पसरण्याची शक्यता) अंतर्गत एफआयआर विभाग क्रमांक ६ पोलीस ठाण्यात ढाब्याच्या मालकाविरुद्ध नोंदवण्यात आला.

Story img Loader