अहमदाबाद येथील एका मॅकडोनाल्डमध्ये एक किळसवाणा प्रकार घडला आहे. हे प्रकरण जाणून घेतल्यावर बाहेरचे खाद्यपदार्थ कितपत सुरक्षित आहेत, असा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. कोल्ड ड्रिंकमध्ये आढळलेल्या मृत पालीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अहमदाबाद महानगरपालिकेने शनिवारी सोला येथील मॅकडोनाल्डचे आउटलेट सील केले. ग्राहक भार्गव जोशी यांच्या तक्रारीची दखल घेत, एएमसी अन्न सुरक्षा अधिकारी देवांग पटेल यांनी अहमदाबाद येथील सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवण्यासाठी या आउटलेटमधून थंड पेयाचे नमुने गोळा केले आणि सार्वजनिक आरोग्य सुरक्षेसाठी तत्काळ हे रेस्टॉरंट सील केले.
ग्राहक भार्गव जोशी यांनी आपल्या कोल्डड्रिंक मध्ये आढळलेल्या मृत पालीचा व्हिडीओ शनिवारी ट्विटरवर पोस्ट केला. भार्गव जोशी आणि त्यांच्या मित्रांनी आरोप केला आहे की, कोणीतरी त्यांच्या तक्रारीची दखल घेईल याची वाट पाहत ते सोला येथील मॅकडोनाल्डच्या आउटलेटमध्ये चार तासांपेक्षा जास्त वेळ बसले होते. भार्गव यांनी सांगितले की तेथील कर्मचाऱ्यांनी त्याला ३०० रुपये परत करण्याची ऑफर दिली. यानंतर भार्गव जोशी यांनी सील करण्यात आलेल्या आउटलेटचा फोटो शेअर केला आणि चांगल्या कामासाठी एएमसीचे कौतुक केले.
‘मौका भी हैं… कानून भी!’ मुंबई पोलिसांचा भन्नाट रिप्लाय पाहून नेटकरी झाले चकित
एक कॉपी पाठवता येईल का?; स्वत:चं अप्रतिम पोर्ट्रेट पाहून आनंद महिंद्रांनी केली विचारणा
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अहमदाबाद महानगरपालिकेने निर्देश दिले आहेत की आउटलेट्सना त्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांचे आउटलेट पुन्हा उघडण्याची परवानगी नाही. दरम्यान, मॅकडोनाल्ड्सने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘मॅकडोनाल्ड्समध्ये आम्ही आमच्या सर्व ग्राहकांची सुरक्षा आणि स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहोत. गुणवत्ता, सेवा, स्वच्छता आणि मूल्य हे आमच्या व्यवसाय ऑपरेशन्सच्या केंद्रस्थानी आहेत. याव्यतिरिक्त, आमच्या गोल्डन गॅरंटी कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, आम्ही आमच्या सर्व मॅकडोनाल्ड रेस्टॉरंटमध्ये ४२ कठोर सुरक्षा आणि स्वच्छता प्रोटोकॉल लागू केले आहेत, ज्यात नियमितपणे स्वयंपाकघर आणि रेस्टॉरंट्सची स्वच्छता आणि स्वच्छता करण्यासाठी कठोर प्रक्रियांचा समावेश आहे.’
त्यांनी पुढे म्हटलंय, ‘अहमदाबाद आउटलेटवर कथितपणे घडलेल्या घटनेची आम्ही चौकशी करत आहोत. आम्ही वारंवार तपासले असताना आणि काहीही चुकीचे आढळले नसताना, आम्ही एक चांगले कॉर्पोरेट नागरिक म्हणून अधिकाऱ्यांना संपूर्ण सहकार्य करत आहोत.’