भटक्या कुत्र्यांचा नागरी वस्तीला होणारा त्रास असो किंवा लोकांकडून मुक्या प्राण्यांवर केला जाणारा अत्याचार असो, या घटना आता नव्या राहिलेल्या नाहीत. मात्र जेव्हा या घटना नव्या उजेडात येतात किंवा त्याचे व्हिडीओ व्हायरल होतात, तेव्हा त्यातील क्रूरता ही सर्वांना धक्का देणारी असते. माणूस म्हणून आपण किती हीन पातळी गाठतो, याचे द्योतक अशा घटनांमधून दिसते. गुजरातच्या अहमदाबादमधील असेच क्रूरतेचे उदाहरण असलेला एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. मृत पावलेल्या एका भटक्या कुत्र्याला गाडीच्या मागे बांधून फरफटत नेल्याचे या व्हिडीओत दिसत आहे.

शनिवारी एक्सवर अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केलेला आहे. सदर घटना गुजरातच्या अहमदाबाद येथील असल्याचे सांगितले जाते. एका एक्सयुव्ही वाहनाच्या मागे भटक्या कुत्र्याला बांधलेले दिसत आहे. सदर वाहन महामार्गावरून या कुत्र्याला फरफटत घेऊन जाताना दिसत आहे. कुणीतरी मागच्या गाडीतून हा व्हिडीओ काढला, ज्यामुळे हे प्रकरण उजेडात आले. अहमदाबादमधील नेमक्या कोणत्या ठिकाणी हा प्रकार घडला, याची माहिती अद्याप हाती आलेली नाही. पेटा या संघटनेने या प्रकाराची दखल घेतल्यानंतर पोलीस पुढील तपास करत आहेत.

Rape case Story
१२ व्या वर्षी गँगरेप, १३व्या वर्षी मातृत्त्व; २४ वर्षांनी त्याच मुलाने आईचे पांग फेडले, नराधमांना शोधून घेतला बदला!
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
devendra fadnavis analysis
“आपण तीन नाही, तर चार पक्षांशी लढत होतो, तो चौथा पक्ष म्हणजे…”; देवेंद्र फडणवीसांकडून लोकसभेतील निकालाचं विश्लेषण!
What Kiran mane Said About Ketki Chitale?
केतकी चितळेला किरण मानेंचा सवाल, “अभिमानाने ‘चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण’ जात सांगणारी ताई आता हिंदू..”
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
Ajit-pawar-lok-sabha-Election-result_4a656f
बारामतीचा पराभव अजित पवारांच्या जिव्हारी? ११ मिनिटांच्या पत्रकार परिषदेत अजित पवारांचं सहावेळा ‘हे’ वक्तव्य
Afghanistan beats australia by 21 runs in Marathi
Afghanistan vs Australia Highlights : अफगाणिस्तानचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय; गुलबदीन ठरला शिल्पकार
Pune Porsche Accident Latest Updates in Marathi
Porsche Crash: “अपघातात दोघांना चिरडून ठार करणाऱ्या मुलावरही आघात झालाय, त्याला..” मुंबई उच्च न्यायालयाचं मत

शनिवारी अनेकांनी हा व्हिडीओ विविध सोशल मीडिया साईटवर पुन्हा पुन्हा शेअर करत वाहनचालकावर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली. तसेच या घटनेमुळे पुन्हा एकदा प्राण्यांविरोधातील क्रूरतेविषयी देशात एक चांगला कायदा असावा, अशीही मागणी पुन्हा एकदा पुढे येत आहे.

पत्रकार वर्षा सिंह यांनी एक्सवर हा व्हिडीओ शेअर करताना संताप व्यक्त केला आहे. “माणूस किती क्रूर झाला आहे. हा कुत्रा मृत असेल तरी त्याला गाडीला बांधून फरफटत नेणे योग्य आहे का? गाडी चालविणारा माणूस त्याच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या पार्थिवाला अशापद्धतीने फरफटत नेऊ शकतो का? तो बिचारा मुका प्राणी जिवंत होता, तेव्हाही काही बोलला नाही. आता मेल्यावर काय बोलणार बिचारा?”, अशा शब्दात त्यांनी आपला रोष व्यक्त केला.

पत्रकार कौशिक कंठेचा यांनी सर्वात आधी हा व्हिडीओ एक्सवर शेअर केला होता. “अहमदाबादमध्ये माणूसकी हरवली”, असे कॅप्शन देऊन मेलेल्या कुत्र्याला अशाप्रकारे फरफटत नेणे योग्य आहे का? हा प्रश्न उपस्थित केला आहे.

विशेष म्हणजे कौशिक कंठेचा यांनी टाकलेल्या पोस्टने पेटा (पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स) या प्राणीमित्र संघटनेनेही लक्ष वेधले आहे. पेटाने या पोस्टला रिप्लाय देत असताना त्यांच्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करून या घटनेची योग्य माहिती देण्यास सांगितले आहे.