आपण शारीरिकरित्या परिपूर्ण आहोत, या गोष्टीची किंमत अनेकांना नसते. सहज उपलब्ध होणाऱ्या इतर गोष्टींप्रमाणे यालाही गृहीत धरलं जातं. आपल्या आजुबाजूला आपण अपंग व्यक्तींना पाहतो, तेव्हा आपल्या शरीराबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. सोशल मीडियावर सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून तुम्ही अशीच कृतज्ञता व्यक्त कराल. नेटकऱ्यांना भावूक करणाऱ्या या व्हिडीओबद्दल जाणून घ्या.
या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती हॉस्पिटलमधील एका खोलीत बसलेला दिसत आहे. २ वर्षांचा असताना झालेल्या एका आजारामुळे या व्यक्तीला तेव्हापासूनच ऐकायला येत नव्हते. त्यावर उपचार करण्यात आल्यानंतर, वयाच्या ३५ व्या वर्षी या व्यक्तीला पहिल्यांदा ऐकायला येऊ लागले. व्हिडीओमध्ये तो पहिल्यांदा आईचा आवाज ऐकून भावूक झाला असल्याचे दिसत आहे. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.
व्हायरल व्हिडीओ :
या व्हिडीओमध्ये त्या व्यक्तीची मुलगी देखील दिसत आहे, या चिमुकलीलाही हा आनंदाच्या क्षणी अश्रू अनावर झाल्याचे दिसत आहे. कुटुंबातील इतर सदस्यही भावूक झाल्याचे दिसत आहेत. या व्हिडीओने नेटकऱ्यांना भावूक केले असून सध्या हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.