Viral Video : आपल्यापैकी अनेकांना नागिन मालिका आवडत असेल. हो, नागिन मालिका. टेलिव्हिजनवरील एक लोकप्रिय मालिका म्हणून या मालिकेची एक आगळी वेगळी ओळख आहे. या मालिकेचे कलाकार, त्यांची वेशभूषा जशी लोकांना आवडते तसेच नागिन मालिकेचे टायटल गाणं सुद्धा लोकांना आवडते. तुम्ही नागिन मालिका बघताना अनेकदा त्याचे टायटल गाणं ऐकले असेल पण कुणाला प्रत्यक्षात या टायटल गाणं ची मिमिक्री करताना किंवा गाताना पाहिले आहे का? (dear nagin tv serial lovers watch talent of this girl amazed you video goes viral)
सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुणी नागिन मालिकेचे टायटल गाणं गाताना दिसत आहे. तिचा सुंदर आवाज ऐकून तुम्ही थक्क व्हाल. नागिन मालिकेच्या चाहत्यांना या तरुणीचं हे टॅलेंट खूप आवडेल.
तरुणीचं टॅलेंट एकदा पाहाच
या व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुणी स्टेजवर माइक समोर उभी आहे आणि प्रेक्षकांमध्ये बसलेली एक व्यक्ती तिचा हा व्हिडिओ शूट करत आहे. ती स्टेजवर नागिन मालिकेचे टायटल गाणं गाताना दिसते. तिच्यातील हे टॅलेंट पाहून प्रेक्षक आश्चर्यचकित होतात आणि आणि जोराने ओरडत टाळ्यांचा वर्षाव करतात. काही प्रेक्षक तिचे व्हिडीओ आणि फोटो काढताना दिसतात. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (video viral)
Itz.prabh987 या इंन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मिमिक्री” या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “एक नंबर मस्त” तर एका युजरने लिहिलेय, “तुम्ही नागिन चाहते असाल तरच तुम्ही हे करू शकता” आणखी एका युजरने लिहिले, “मला विश्वास बसत नाही. मला असं वाटले की नागिन मालिका हा आवाज एडिट करत असेल” एक युजर लिहितो, “याला म्हणतात खरं टॅलेंट” अनेक युजर्सनी या तरुणीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. काही युजर्स या तरुणीचा आवाज ऐकून थक्क झाले.