मागील काही दिवसांपासून केदारनाथ मंदिरासमोरील काही व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. जे पाहिल्यानंतर भाविकांनी केदारनाथ मंदिराजवळ मोबाईल वापरण्यावर बंदी घालावी अशी मागणी केली होती. यातील एका व्हिडीओमध्ये एक युट्युबर महिलेने तिच्या प्रियकराला मंदिरासमोरच अंगठी घालून प्रपोज केला होता. तर दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये मुलगा मुलीच्या भांगेत कुंकू भरतना दिसत होता. हे व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी या कृतीचा निषेध केला होता. शिवाय अशी कृत्य मंदिराच्या आवारात करणं अयोग्य असल्याचंही लोकांनी म्हटलं होतं. लोकांचा वाढता विरोध पाहता श्री बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीने (Shri Badarinath Kedarnath Temple Committee) पोलिसांना पत्र लिहून केदारनाथ मंदिराच्या परिसरात युट्युबर, व्हिडीओ आणि इंस्टाग्राम रील्स बनवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती.

केदारनाथ मंदिर समितीने (BKTC) लिहिलेल्या पत्रानंतर उत्तराखंड पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत मंदिराच्या परिसरात व्हिडिओ आणि रील शूट करणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल असं सांगितलं आहे. समितीने म्हटले आहे की, असे व्हिडिओ रील्स धार्मिक ठिकाणांच्या पावित्र्यावर नकारात्मक परिणाम करतात, शिवाय अशा घटनांमुळे भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात, त्यामुळे पोलिसांनी मंदिराच्या परिसरात व्हिडिओ बनवणाऱ्यांवर कडक नजर ठेवण्याची विनंतीही मंदिर समितीने केली होती. मात्र तक्रारीमध्ये BKTC ने कोणत्याही एका व्हिडिओचा विशेष उल्लेख केलेला नाही.

Mumbai Police begins investigation into YouTuber Ranveer Allahabadia case
युट्यूबर रणवीर अलाहबादिया प्रकरणी मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
Arvind Kejriwal Old Video
Arvind Kejriwal Old Video : “मोदीजी या जन्मात तरी दिल्लीत…”, अरविंद केजरीवालांचा भाजपाला आव्हान देणारा जुना Video Viral
viral video
Video : हे काय चाललंय पुण्यात! वाहतूक पोलिसाच्या अंगावर धावून आली व्यक्ती, नेमकं काय प्रकरण काय?
pune police
पुण्यात दहशत माजवणाऱ्यांना पुणे पोलिसांनी दाखवला इंगा! गाड्यांची तोडफोड करणाऱ्यांची रस्त्यावरून काढली धिंड, Video Viral
pune crime news in marathi
Pune Crime News : बिबवेवाडीत टोळक्याकडून ५० हून अधिक वाहनांची तोडफोड
Rahul Gandhi
Rahul Gandhi : “७० लाख मतदार अचानक…”, राहुल गांधींचा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत गंभीर आरोप
Lakshmi Niwas Marathi Serial Jahnavi take ukhana for Jayant
Video: “रायगडावर आहे स्वराज्याची राजधानी…”, ‘लक्ष्मी निवास’मधील जान्हवीने जयंतसाठी घेतला जबरदस्त उखाणा

हेही पाहा- रुळावर मस्ती करणं तरुणाच्या अंगलट; रील करण्याच्या उत्साहात मागे सरला अन् रेल्वेने दिली धडक, थरारक घटनेचा Video व्हायरल

व्हायरल व्हिडीओत नेमकं काय होतं?

व्हायरल व्हिडीओमध्ये यूट्यूबर महिला जोडीदाराबरोबर केदारनाथ मंदिराच्या दिशेने हात जोडून उभी असल्याचं दिसत आहे. यावेळी ती महिला हातात अंगठी घेऊन गुडघ्यावर बसते आणि जोडीदाराला प्रपोज करते. यावेळी समोरचा मुलगा आश्चर्यचकित होतो आणि मुलगी त्याला अंगठी घालते. यानंतर ते दोघे एकमेकांना मिठीही मारतात. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी मंदिर परिसरात शूटींग करण्यावर बंदी घालावी अशी मागणी केली होती. दरम्यान, या सर्व प्रकरणाची दखल घेत समितीने पोलिसांना पत्र लिहिलं होतं.

समितीने म्हटलं, “काही यूट्यूबर्स आणि इंस्टाग्राम रील्स तयार करणारे केदारनाथ मंदिराजवळ असे काही व्हिडिओ तयार करतात ज्यामुळे देशातील आणि परदेशातील भाविकांच्या भावना दुखावतात. केदारनाथला भेट देणाऱ्या भाविकांच्या श्रद्धेवर अशा व्हिडिओंचा नकारात्मक परिणाम होतो.” मंदिर समितीच्या या मागणीनंतर पोलिसांनी आता केदारनाथ मंदिरात व्हिडीओ आणि रील शूटिंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असं सांगितलं आहे.

Story img Loader