मागील काही दिवसांपासून केदारनाथ मंदिरासमोरील काही व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. जे पाहिल्यानंतर भाविकांनी केदारनाथ मंदिराजवळ मोबाईल वापरण्यावर बंदी घालावी अशी मागणी केली होती. यातील एका व्हिडीओमध्ये एक युट्युबर महिलेने तिच्या प्रियकराला मंदिरासमोरच अंगठी घालून प्रपोज केला होता. तर दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये मुलगा मुलीच्या भांगेत कुंकू भरतना दिसत होता. हे व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी या कृतीचा निषेध केला होता. शिवाय अशी कृत्य मंदिराच्या आवारात करणं अयोग्य असल्याचंही लोकांनी म्हटलं होतं. लोकांचा वाढता विरोध पाहता श्री बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीने (Shri Badarinath Kedarnath Temple Committee) पोलिसांना पत्र लिहून केदारनाथ मंदिराच्या परिसरात युट्युबर, व्हिडीओ आणि इंस्टाग्राम रील्स बनवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा