Deep Diving Video Tavi Castro: आजवर अनेकदा आपण सोशल मीडियावर डोळ्याला व मेंदूला विश्वासच बसणार नाहीत अशी दृश्य पाहिली असतील. आज सुद्धा आपण एक असाच व्हायरल व्हिडीओ पाहणार आहोत ज्यामध्ये एका फ्रीडायविंग करणाऱ्या व्यक्तीने एकाच श्वासात समुद्रात तब्बल ३२ मीटर खोल पर्यंत पोहून पोहचण्याचा विक्रम केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी तर या व्यक्तीला ग्रीक गॉड म्हणून घोषित केलं आहे. असं म्हणण्याचं एक आणखी कारण म्हणजे या व्यक्तीचा फिटनेस हा भल्याभल्या सेलिब्रिटींना लाजवणारा आहे. नेमका हा प्रकार काय हे पाहूया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

@the.experience.media या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओ मध्ये आपण पाहू शकता की तावी कास्ट्रो (Tavi Castro) नामक एका व्यक्तीने खोल समुद्रात उडी घेतली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये, तावी एकाच श्वासात ३२ मीटरपर्यंत म्हणजेच साधारण १०० फुटापर्यंत खाली जाताना दिसत आहे. यापूर्वी एक जागतिक विक्रम विल्यम ट्रुब्रिजने केला होता. त्याने डायव्हिंग दरम्यान सर्वात वाईट परिस्थिती रोखण्यासाठी स्वत: ला प्रशिक्षित केले होते जेणेकरुन तो अधिक खोलवर जाऊ शकेल.

फ्रीडायव्हिंगमध्ये गोताखोर जास्त वेळ श्वास टिकून राहण्यासाठी फक्त एक श्वास वापरून पाण्याच्या पृष्ठभागावर सुरुवात करतात. परंतु १०० मीटरपर्यंत खोलवर गेल्यास भान गमावून डोळ्यासमोर अंधारी येण्याचा सुन्न होण्याचा धोका असतो. ज्यामुळे मृत्यूही होऊ शकते.

हे ही वाचा<< १००० वर्षातून एकदाच येतो आजचा दिवस? तुमच्याही वाढदिवसाची आकडेमोड करून पाहा, नेमका असं का होतं?

दरम्यान, सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी मात्र भन्नाट कमेंट्स करून कमेंट बॉक्स पूर्णपणे भरून टाकला आहे. या व्हिडिओला तब्बल लाखभराहून अधिक लाईक्स व अनेक शेअर आहेत. काहींनी तावी हा माणूस नाहीच इथपासून ते तावी हा देवच आहे इथपर्यंत कमेंट केल्या आहेत. एखाद्या गोष्टीतल्या हिरोसारखा हा गोताखोर आता एखाद्या समुद्री सुंदरीला घेऊनच समुद्रात बाहेर येईल अशा भन्नाट कल्पक कमेंट्ससुद्धा तुम्ही वाचू शकता, एकाने तर अगदी मजेशीर कमेंट करत मला ‘दोन सेकंदात गुदमरायला होतं, याला कसं शक्य झालं’, असाही प्रांजळ प्रश्न केला आहे.