Deepti Sharma Run Out Funny Memes: भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना शनिवारी (२४ सप्टेंबर) लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळला गेला, ज्यामध्ये हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने १६ धावांनी विजय मिळवला. अगदी बरोबरीचा झालेला हा सामना अगदी शेवटच्या बॉलपर्यंत रंगला, खरंतर सरतेशेवटीच भारताची गोलंदाज दिप्ती शर्मा हिने केलेली कमाल ही इंग्लंड विरुद्ध सामन्याची खरी शान ठरली. दिप्ती शर्माने ४४ व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर अष्टपैलू खेळाडू शार्लोट डीनला धावबाद केले. दिप्तीने नियम पळून शार्लोटला बाद केले असले तरी हे खेळाचं ‘Spirit’ नाही म्हणत अनेकांनी तिच्यावर टीका केली आहे. एकीकडे हा सर्व वाद सुरु असताना दुसरीकडे नेटकऱ्यांना मात्र मीम बनवण्यासाठी नामी संधी मिळाली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा