Viral Video: समाजमाध्यमांवर कधी काय पाहायला मिळेल हे सांगता येत नाही. यावर सतत विविध विषयांवरील आधारित व्हिडीओ व्हायरल झालेले आपण पाहतो, ज्यात डान्स, गाणी अशा अनेक गोष्टी असतातच. पण, बऱ्याचदा यावर जंगलातील प्राण्यांचे कधी थरकाप उडवणारे तर कधी मजेशीर व्हिडीओही आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा यातील हिंस्र प्राणी इतर प्राण्यांची शिकार करताना तर त्यांच्याबरोबर भांडताना दिसतात; तर कधी काही प्राणी एकमेकांसह खेळताना दिसतात. आता असाच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, ज्यात दोन हरीण चक्क भारत-पाकिस्तान सीमेवर एकमेकांबरोबर भांडण करताना दिसत आहेत.
पाकिस्तान हा जुन्या भारताचाच एक भाग असला तरी मागील अनेक दशकांपासून या दोन्ही देशांतील तणाव सतत वाढत आहे. पाकिस्तानकडून भारतावर आतापर्यंत अनेक दहशतवादी हल्ले करण्यात आले आहेत. पाकिस्तानी सैन्यामध्येच नाही, तर तिथल्या सामान्य नागरिकांमध्येदेखील भारत देशाबद्दल आणि येथील लोकांबद्दल तिरस्कार आहे. या संदर्भातील अनेक किस्से, घटना आपण ऐकत वा पाहत आलो आहोत. दरम्यान, सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये चक्क दोन हरीण एकमेकांना खुन्नस देताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
नक्की काय घडलं व्हिडीओमध्ये? (Viral Video)
हा व्हायरल व्हिडीओ भारत-पाकिस्तान सीमेवरील असून यातील एक हरीण भारतातील आहे, तर सीमेपलीकडे उभे असलेले दुसरे हरीण पाकिस्तानातील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हे दोघेही जेव्हा एकमेकांसमोर येतात तेव्हा एकमेकांकडे तिरस्काराने बघतात आणि एकमेकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. पण, यावेळी या दोघांमध्ये लोखंडी तारेची सीमा असल्याने ते पुन्हा मागे फिरतात. बराच वेळ त्यांचे हे भांडण सुरूच राहते. एका BSF ऑफिसरने हा व्हिडीओ शूट केलेला आहे.
हा व्हिडीओ X(ट्विटर) वरील @Ghar Ke Kalesh या अकाउंंटवर शेअर करण्यात आला असून याच्या कॅप्शनमध्ये, “पाकिस्तानचे हरीण आणि भारतातील हरीण यांचे भांडण, BSF ऑफिसरने शूट केलेला व्हिडीओ”, असे लिहिण्यात आले आहे. या व्हिडीओला आतापर्यंत नऊ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून यावर १३ हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
युजर्सच्या कमेंट्स चर्चेत
एका युजरने यावर लिहिलंय की, “पाकिस्तानच्या हरणापेक्षा भारताचे हरीण खूप स्ट्राँग आहे”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “एका कारणामुळे सर्वात मोठी स्पर्धा”, तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “हे भांडण फक्त सलमान खानच सोडवू शकतो.” तर चौथ्या युजरने लिहिलंय की, “प्राण्यांमध्येही तिरस्कार आहे.”