रानावनात मुक्त संचार करणारे प्राणी तहानेनं व्याकुळ झाल्यावर पाण्याच्या शोधात नदी किनारी येतात. पण हरणासारखा शांत स्वभावाचा प्राणी कधी कोणत्या हिंस्र प्राण्याची शिकार होईल, याचा नेम नाही. कारण एका हरणाचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. पाणी पिण्यासाठी गेलेल्या हरणावर मगरीने हल्ला केला. पण मगरीच्या जबड्यातून चपळ हरण कसाबसा निसटला. हरणाने मोकळा श्वास घेतला नाही तोच त्याच्यासमोर बिबट्या उभा ठाकला. हा थरारक व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. पाण्यात जावं तर मगरीची शिकार अन् बाहेर पडावं तर बिबट्याची भीती, अशा भयावह परिस्थितीत अनेक छोटे प्राणी जंगलात राहत असतात.
मगरीच्या तावडीतून सुटला अन् हरणाच्या समोर बिबट्या आला…..
हरणावर वन्य प्राण्यांनी हल्ला केल्याचा @natureisbrutal1 या नावाच्या युजरने ट्विटरवर शेअर केला आहे. एक हरण पाण्याच्या शोधात नदी काठावर आल्यावर मगर तिच्या पायावर हल्ला करते. पण चालाख हरण जराही न डगमगता मगरीला जशाचं तसं उत्तर देत पळ काढते. मात्र, हरण पाण्याच्या बाहेर पडताच पुन्हा एकदा तिच्यावर मोठं संकट उभं राहतं. कारण जंगलातून एक बिबट्या शिकारीसाठी प्राण्यांच्या शोधात आलेला असतो आणि त्याचदरम्यात मगरीच्या तावडीतून सुटलेला हरण त्याला दिसतो. त्यानंतर बिबट्या त्याच्यावर झेप घेत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून आतापर्यंत या व्हिडीओला ८० हजारांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. तर हजारोंच्या संख्येत लाईक्सही मिळाले आहेत. काही नेटकऱ्यांना हा व्हिडीओ मजेशीर वाटल्याने त्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
इथे पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, “हे तर बिचाऱ्या हरणासाठी रोजचंच आहे.” दुसऱ्या एकान नेटकऱ्याने म्हटलं, “हे खूप वाईट आहे. ” पुढच्या प्रवासासाठी तुला शुभेच्छा” असं अन्य एक नेटकरी म्हणाला. तर चौथा नेटकरी प्रतिक्रिया देत म्हणाला,” हे खूप भीतीदायक आहे, पण रोमांचकही आहे.” जंगलात चरण्यासाठी आलेले हरणांचे कळप वाघ, सिंह, बिबट्या यांसारख्या हिंस्र प्राण्यांचे शिकार झालेले अनेक व्हिडीओतून आपण पाहिल आहे. पण काही हरण इतके चपळ असतात की, वाघालाही ते घाम फोडतात. त्यांची उंच उड्या मारण्याची स्टाईल आणि चपळाईने धूम ठोकण्याची वेळ पाहून वाघ, सिंहांसारख्या प्राण्यांच्याही नाकी नऊ येतात. हा थरारक व्हिडीओ काहिंना मजेशीर वाटला असेल तर काहिंना थरारक वाटल्यांचं प्रतिक्रियांच्या माध्यमातून समोर आलं आहे.