अलिकडे मनुष्य आणि वन्यप्राणी एकमेकांसमोर आल्याचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. एका व्हिडिओत एका गव्याने ऑटोला जोरदार धडक दिली होती. या धडकेत ऑटोचा पुढील भाग आकाशाच्या दिशेने उभाच झाला होता. हे हैराण करणारे दृश्य होते. आता मनुष्य आणि वन्यप्राणी पुन्हा एकदा समोरा समोर आल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मात्र या व्हिडिओमध्ये कुठलीही हिंसा नसून, एक हरीण उड्या मारत वेगाने रस्ता ओलांडत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आयएफएस अधिकारी सुसांता नंदा यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये एक हरीण हिरव्या मैदानातून उड्या मारत रसत्यावर येताना दिसत आहे. हरीण उड्या मारत मारत रस्त्याजवळ आला आणि त्याने मोठी उडी घेत रस्ता ओलांडला. यावेळी रस्त्यावर वर्दळ होती. वाहनांची ये जा सुरू होती. मात्र कसलीही भिती न बाळगता किंवा माघारी न जाता हरिणाने वेगाने रस्ता ओलांडला. हरिणाच्या या जबरदस्त उड्यांकडे रस्त्यावरचे प्रवाशी पाहतच राहिले आणि ते वेगाने निघून गेला.

(‘या’ व्हिस्कीच्या केवळ एका शॉटची किंमत चक्क ४.७ कोटी! या कारणांमुळे महाग)

या व्हिडिओला आतापर्यंत १५ हजारांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच व्हिडिओला ८०० पेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत. हा व्हिडिओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. काहींनी हे दुर्मिळ दृश्य असल्याचे म्हटले आहे. हरिणाचा वेग आणि त्याने मारलेल्या उड्या पाहून अनेक जण हैराण झाले आहेत.

नेटकरी म्हणाले आपल्यामुळे त्यांना भरपूर..

व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भरपूर प्रतिक्रिया दिल्या आहेत. वर्दळीच्या रसत्यावरून हरीण जात असल्याचे पाहून एकाने आपल्यामुळे प्राणी आणि त्यांच्या निवासस्थानाला त्रास होत असल्याची खंत व्यक्त केली आहे. तर एका युजरने हरणाला वाहनांमुळे इजा झाली नसल्याचे सांगत समाधान व्यक्त केले आहे. तर दुसऱ्या एका युजरने तो घाबरला असेल असे अंदाज व्यक्त केला. तर काही युजरने हरिणाच्या उडीचे कौतुक केले आहे. तर एकाने मनापेक्षाही हरिणाची गती अधिक असल्याचे म्हटले.