लोकांना कायमच वन्य जीवनाविषयी कुतुहल असतं. प्राण्यांना पहायला आणि त्यांच्याविषयी जाणून घ्यायला अनेकजण तयार असतात. वन्य जीवनाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी बरेचजण जंगल सफारीसाठीही जातात. प्राण्यांचे बरेच फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसतात. अशा व्हिडीओंना नेटकऱ्यांची नेहमीच पसंती असते. सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधीत तुम्ही अनेक व्हिडीओ पाहिले असतील. हे व्हिडीओ कधी थरारक असतात. तर काही व्हिडीओ हे मजेदार असतात. यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे. हरिण आणि मगरीचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
दरम्यान एका हरणानं मगरीला चांगलच अस्मान दाखवलंय. हरीण मगरीच्या तावडीतून अतिशय हुशारीनं सुटलं आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हरीण किती चपळ प्राणी आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. याच हरणानं शिकारीसाठी आलेल्या मगरीला चांगलंच फसवलंय. काही वन्य प्राणी असे असतात की ते जंगलात असो किंवा दुसरीकडे कुठे, त्यांची भीती कायम असते. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक हरिण एका पाण्याच्या तळापाशी पाणी पित आहे. मात्र या तळ्यात मगर लपून बसली आहे आणि वेळ मिळताच ती संधी साधणार आहे याचा बिलकुल अंदाज हरणाला नाहीये. तेवढ्यात पाण्यातून मगर बाहेर येते आणि हरणाचं तोंड आपल्या जबड्यात पकडण्याचा प्रयत्न करते , मात्र चपळ हरीण अतिशय सहजपणे मगरीच्या तावडीतून सुटते. मगरीला मात्र हरणाला आपले शिकार बनवता आले नाही. हा व्हिडिओ पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले असून, या व्हिडिओवर आपापल्या पद्धतीने प्रतिक्रियाही देत आहेत.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> धाडस की मूर्खपणा… ८ सेकंदचा व्हायरल व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल; काय घडलं?
हा चित्तथरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @ta.na4408’s नावाच्या युजरने शेअर केला आहे, जो आतापर्यंत १५ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.लोक वारंवार हा व्हिडीओ पाहात आहेत. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत. यावर काही युजर्सनी प्रतिक्रियाही दिल्या.