सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधीत तुम्ही अनेक व्हिडीओ पाहिले असतील. हे व्हिडीओ कधी थरारक असतात. तर काही व्हिडीओ हे मजेदार असतात. काही वन्य प्राणी असे असतात की ते जंगलात असो किंवा दुसरीकडे कुठे, त्यांची भीती कायम असते. यात सिंह आणि वाघांचा क्रमांक पहिला येतो. ते जगातील सर्वात भयानक प्राण्यांपैकी एक मानले जातात, जे मानवांवर देखील हल्ला करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. त्यांना भूक लागली तर ते कोणालाही आपला बळी बनवू शकतात. दरम्यान एका हरणानं सिंहाला चांगलच अस्मान दाखवलंय. हरीण सिंहाच्या तावडीतून अतिशय हुशारीनं सुटलं आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हरीण किती चपळ प्राणी आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. याच हरणानं शिकारीसाठी आलेल्या सिंहाला चांगलंच फसवलंय. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका तळ्यात हरीण पाणी पित आहे, याचवेळी समोरुन सिंह जोरदार हल्ला करण्यासाठी हरणाकडे येतो. सिंहाला पाहून हरिण मागच्या दिशेने पळायचं नाटक करत सिंहाला हलकावणी देतो. सिंह मागच्या दिशेने वेगात जातो तसं हरीण समोरुन पळून जातं. हरणाच्या या हुशारीचं सगळेच कौतुक करत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> संतापजनक! अंथरुणाला खिळलेल्या सासऱ्यांसोबत सुनेचं अमानुष कृत्य; चादर पेटवली, शिवीगाळ केली अन्…VIDEO व्हायरल

हा चित्तथरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर billionaires.show या अकाऊंटवरुन व्हायरल झाला आहे. लोक वारंवार हा व्हिडीओ पाहात आहेत. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत. यावर काही युजर्सनी प्रतिक्रियाही दिल्या.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deer save his life from lion by using his brain and trick video viral srk
Show comments