बॅंकेत रांगेत उभं राहून पैसे काढण्यात वेळ जात असल्याने अनेक जण एटीएममध्ये जाऊन पैसे काढतात. बॅंकेला सुट्टी असली की, एटीएमसमोर माणसांच्या रांगाच रांगा लागलेल्या दिसतात. दैनंदिन जीवनात अत्यंत महत्वाचा घटक असणाऱ्या पैशांचे आर्थिक व्यवहार बॅंकेतून केले जातात. पण सर्वच ठिकाणी बॅंकेच्या शाखा उपलब्ध नसल्याने एटीएमद्वारे पैसे काढण्याचा पर्याय असतो. गुजरातच्या धारी येथील अमरेलीच्या एटीएममध्येही पैसे काढण्यासाठी माणसांची गर्दी असते. पण या एटीएममध्ये माणूस नाही तर चक्क हरण घुसल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रानावनात भटकणाऱ्या प्राण्यांनाही पैशांचा मोह झाला आहे का? हा व्हिडीओ पाहिल्यानंतर असा प्रश्न तुम्हाला नक्की पडेल. पण या एटीएममध्ये हरणाने कसा काय प्रवेश केला? नेमकं काय घडलं की, हरणाला थेट एटीएमचा आश्रय घ्यावा लागला. रस्त्यावर भटकणाऱ्या कुत्र्यांनी हरणाचा पाठलाग केल्याने जीव वाचवण्यासाठी त्याने थेट एटीममध्ये उडी घेतली. कुत्र्यांच्या हल्ल्यापासून बचाव करणाऱ्या हरणाची एटीममध्ये अडकल्यानंतरही पंचाईत झाली. एका संकटातून बाहेर पडलो नाही, तोच दुसरं संकट उभं ठाकलं, अशीच परिस्थिती त्या हरणाची झालेली या व्हिडीओत दिसत आहे.

इथे पाहा व्हिडीओ

भीतीनं फणफणलेलं हरण एटीएमच्या बाहेर येण्यासाठी जीवाची बाजी लावताना या व्हिडीओत दिसत आहे. हरण एटीएममध्य अडकल्याचं वन विभागाच्या अधिकाऱ्यांना समजलं, त्यानंतर तातडीनं त्यांनी हरणाला एटीएममधून बाहेर काढलं आणि जंगलात सोडलं.हरणाचा हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला असून प्रचंड व्हायरल होत आहे. जंगलातील प्राण्यांचा मुक्त संचार वाढला असल्याचं अनेक व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे. गवा, बिबट्या, माकडांचा वावर मानवी वस्तीत वाढत असल्याने माणसांना सतर्क राहण्याचं आवाहनंही वनविभागाकडून केलं जातं.