सोशल मीडियावर या ना त्या कारणाने व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल कारण एक सांबर जलाशयात स्विमिंग करताना दिसून आलं आहे. कोयना अभयारण्यातील शिवसागर पर्यटकांना हे दुर्मिळ दृश्य अनुभवायला मिळालं आहे.
सोशल मीडियावर प्राण्यांचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण सध्या व्हायरल होत असलेला हा सांबराचा व्हिडीओ ह्रदयाला भिडणारा आहे. तुम्ही हे वाक्य अनेकदा ऐकलं असेल की जेव्हा स्वतःचा जीव वाचवण्याची वेळ येते तेव्हा एखाद्या उंदरातही सिंह जागा होतो आणि तो परिस्थितीचा अगदी धाडसाने सामना करतो. असंच काहीसं सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं. यात दिसतं की जेव्हा एका सांबराचा जीव धोक्यात येतो तेव्हा तो अगदी जीवाच्या अकांताने प्रयत्न करून मोठ्या जलाशयात पाण्याच्या प्रवाहात पोहत आहे. पाण्याच्या जोरदार प्रवाहामध्ये सांबर अडकल्याचं तुम्ही पाहू शकता.
आणखी वाचा : जेव्हा दोन हत्तींमध्ये ‘दंगल’ होते, त्यानंतर असा तांडव रंगला…पाहा Viral Video
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की सांबर पाण्याच्या प्रवाहात पूर्ण बुडालेला आहे. तो आपलं डोकं वर काढत बुडण्यापासून स्वतःला वाचवत आहे. इतक्या मोठ्या जलाशयातून सांबर पोहत स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सुरू असलेला त्याचा संघर्ष पाहून मनात थोडी धडकी भरू लागते. आज सकाळच्या सुमारास तिथे बोटीने वासोटा किल्ल्याच्या दिशेने निघालेल्या काही ट्रेकर्सना हे दृश्य दिसून आलं. मेट इंदोली परिसरात कोयना अभयारण्यातील सांबर शिवसागर जलाशयाच्या एका तिरावरून दुसऱ्या तीरावर पोहत जात असताना पाहून तिथल्या ट्रेकर्सनी हे दृश्य आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले.
आणखी वाचा : बसमध्ये घुसून महिलेनं ड्रायव्हरला केलेल्या मारहाणीचा VIDEO VIRAL
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : अशी मैत्री तुम्ही कधी पाहिली नसेल, या दोन मित्रांचा VIDEO VIRAL
हा आश्चर्याचा सुखद धक्का देणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर बघता बघता वाऱ्यासारखा पसरू लागला. हा व्हिडीओ पाहून लोक यावर निरनिराळ्या प्रतिक्रियाही देत आहेत. आपला जीव संकटात असल्याचं पाहून सांबर ज्या पद्धतीने स्विमिंग करत आहे ते बघताच लोकही भावुक झाले आहेत. या व्हिडीओवरून लोक अनेक सकारात्मक संदेशही शेअर करताना दिसून येत आहे. जर आपला स्वतःवर विश्वास असेल आणि कोणत्याही संकटाला धीराने सामोरे गेलं तर आपलं कुणीच काही बिघडवू शकणार नाही, असं देखील काही युजर्स या व्हिडीओखालील कमेंट्समध्ये सांगत आहेत.