Deer vs crocodile video: जंगलात प्राण्यांना जगण्यासाठी दररोज संघर्ष करावा लागतो. ‘शिकार करो या शिकार बनो’ हा जंगलात जगण्याचा नियम आहे. जर तुम्हाला शिकार करता येत नसेल तर सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायलाच हवी. अन्यथा तुमची काही खैर नाही. जंगलात कोणीही सुरक्षीत नसतं. जंगलात प्रत्येक प्राण्याला त्याची स्वत:ची सुरक्षा करण्यासाठी खूप अलर्ट राहावं लागतं. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. हरिण आणि मगरीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. एका हरणानं मगरीला चांगलच अस्मान दाखवलंय. हरीण मगरीच्या तावडीतून अतिशय हुशारीनं सुटलं आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हरीण किती चपळ प्राणी आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. याच हरणानं शिकारीसाठी आलेल्या मगरीला चांगलंच फसवलंय. काही वन्य प्राणी असे असतात की ते जंगलात असो किंवा दुसरीकडे कुठे, त्यांची भीती कायम असते. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक हरिण एका पाण्याच्या तळापाशी पाणी पित आहे. या तळ्यात मगर लपून बसली आहे आणि वेळ मिळताच ती संधी साधणार आहे याचा पूर्ण अंदाज हरणाला आहे. मात्र तरीही हरणाने या तळ्यातलं पाणी पिण्याचं धाडस केलं. प्रत्येक वेळी जर घाबरून राहिलं तर इकडे टिकाव लागणार नाही हे हरणाने जाणलं आणि अतिशय चलाखीने तो पाणी प्यायला गेला. हरणाने पाणी प्यायला सुरुवात करताच काहीच सेंकदात मगर हरणावर हल्ला करण्यासाठी पाण्याच्या बाहेर येते. पाण्यातून मगर बाहेर येते आणि हरणाचं तोंड आपल्या जबड्यात पकडण्याचा प्रयत्न करते , मात्र चपळ हरीण अतिशय सहजपणे मगरीच्या तावडीतून सुटते. हरणाने बरोबर लक्ष ठेवून मगरीची चाहूल लागताच तळ्यातून मागे झाला.

यावेळी हरणाने दाखवलेलं धाडस आणि स्वत:चा जीव वाचवण्यासाठी केलेला प्रयत्न पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.‘शिकार करो या शिकार बनो’ हा जंगलात जगण्याचा नियम आहे. जर तुम्हाला शिकार करता येत नसेल तर सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायलाच हवी.अन्यथा तुमची काही खैर नाही. जंगलात कोणीही सुरक्षीत नसतं. जंगलात प्रत्येक प्राण्याला त्याची स्वत:ची सुरक्षा करण्यासाठी खूप अलर्ट राहावं लागतं. 

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं” कुत्र्यांनी अवघ्या १० सेकंदात बिबट्याला फाडून टाकलं; VIDEO पाहून झोप उडेल

सोशल मीडियावर @infoinsightdaily नावाच्या एक्स अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून व्हिडीओची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.  या व्हिडीओला शेकडो नेटकऱ्यांनी लाईक केलं आहे. तसंच व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यातील एकानं म्हंटलं आहे की, “नशीब नाही मित्रा प्रयत्नांचा खेळ आहे.” तर आणखी एकानं म्हंटलं आहे की, “यालाच आयुष्य म्हणतात”