मुंबईतील नौदल गोदीत आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते भारतीय नौदलाच्या पहिल्या एअरक्राफ्ट कॅरियर ड्राय डॉकचं उद्घाटन झालं. भारतीय नौदलाचा हा सर्वात मोठा ड्राय डॉक आहे. या डॉकमध्ये विमानवाहू युद्धनौकेला सामावून घेण्याची क्षमता आहे. या डॉकमुळे INS विक्रमादित्यची आता मुंबईत दुरुस्ती करता येईल. याआधी INS विक्रमादित्यच्या दुरुस्तीसाठी कोचीन शिपयार्डवर अवलंबून रहावं लागतं होतं.

ही आहेत वैशिष्ट्ये

  •  नौदल गोदीतील हा ड्राय डॉक २८१ मीटर लांब असून ४५ मीटर रुंद आहे. या डॉकचा तळ १७ मीटर आहे.
  •  नौदलाच्या डीजीएनपीने हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीला हा ड्राय डॉक बांधण्याचे काँट्रॅक्ट दिले होते.
  • समुद्रात बांधण्यात आलेला हा पहिला एअरक्राफ्ट कॅरियर ड्राय डॉक आहे.
  • समुद्रातील हा दुरुस्ती तळ इंजिनिअरींग कौशल्याचे उत्तम उदहारण आहे.
  • या तळाच्या उभारणीसाठी समुद्राच्या तळाशी विशिष्ट प्रकारचे सिमेंट टाकण्यात आले असून दोन्ही बाजूंनीही सिमेंटच्या ठोकळ्यांची भिंत उभारण्यात आली आहे
  • या ड्राय डॉकमध्ये जी यंत्रणा वापरण्यात आली आहे. त्यामुळे डॉकला समुद्राच्या पाण्याने भरण्यासाठी फक्त ९० मिनिटं लागतील तसचं पाणी काढण्यासाठी आठ शक्तीशाली पंप बसवले असून १५० मिनिटात सर्व पाणी काढून टाकले जाईल.

या ड्राय डॉकची आणखी काही खास वैशिष्टय आहेत

  •  ऑलिम्पिक साईझच्या ८० स्विमिंग पूलपेक्षा जास्त पाणी यामध्ये राहू शकते.
  •  ड्राय डॉकच्या बांधणीमध्ये ८ हजार मेट्रीक टन स्टीलचा वापर करण्यात आला असून जगप्रसिद्ध आयफेल टॉवरच्या बांधणीमध्ये सुद्धा इतक्यात प्रमाणात स्टील वापरण्यात आले होते.
  •  तसेच पाच लाख टन काँक्रीट वापरण्यात आले आहे.

एकावेळी विमानवाहू युद्धनौका आणि इतरवेळी दोन युद्धनौका सामावून घेण्याची क्षमता या ड्राय डॉकमध्ये आहे. युद्धनौका समुद्रात असताना दुरुस्ती, देखभालीची गरज पडते. आता या नव्या डॉकमुळे नौदलाच्या कार्यक्षमतेमध्ये मोठी वाढ होणार आहे.

Story img Loader