उत्तराखंडच्या देहरादूनमध्ये तीन तरुण आणि दोन तरुणींमध्ये भांडण झालेल्या हाणामारीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ही घटना देहरादूनमधील सहस्त्रधारा पर्यटन स्थळी घडल्याचे समजचते आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओंची पोलिसांनी दखल घेतली आणि रविवारी देहरादूनच्या राजपूर भागातून तिघांना अटक केली.

तरुण-तरुणींची मारामारी

व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की, कशाप्रकारे तरुण-तरुणी एकमेकांना मारत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला एक मुलगा एका मुलीला जोरादार बुकी मारतो. दुसरा तरुण त्याला अडवण्यासाठी मध्ये येतो. तरुणी देखील त्या तरुणाला दगड फेकून मारते. त्यानंतर दुसरी तरुणी एका तरुणाला दगड फेकून मारताना दिसते. रागा रागात ती त्याला काहीतरी बोलत आहे. ती तरुणाला मारण्यासाठी धावते तेव्हा इतर दोन तरुण मध्ये येतात. पहिली तरुणी त्या तरुणाच्या कानाखाली मारते. दोघी मिळून त्याला मारताना दिसत आहे. त्या तरुणी इतक्या चिडल्या आहेत की, एक जण लाथा मारत आहे तर दुसरी बेल्टने मारत आहे. त्यानंतर तरुण त्या दोन्ही तरुणींना मारहाण करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा इतर दोन तरुण मध्ये येतात. तेवढ्यात एक तरुण बाईक घेऊन येतो आणि भांडण करणारा तरुण त्यावर बसून निघून जातो. रागात तरुणी मित्राला वाचवणाऱ्या तरुणालाही बेल्टने मारताना दिसत आहे.

“शनिवारी प्रसारित झालेल्या व्हिडिओमध्ये, तिघेही सहस्त्रधाराजवळ एका तरुणीला मारहाण करताना दिसत होते. त्यांच्या दोन स्कूटरच्या नोंदणी क्रमांकांच्या आधारे, पोलिसांनी त्यांची माहिती शोधली आणि त्यांना राजपूर पोलिस ठाण्यात बोलावले,” असे मीडिया हाऊसने दिलेल्या वृत्तानुसार डेहराडूनचे एसएसपी अजय सिंह यांनी सांगितले.

तीन तरुणांना अटक:

अटक केलेल्या तरुणांची ओळख प्रमोद सिंग, आकाश सिंग आणि गौरव रावत अशी आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये तीन तरुण आणि दोन तरुणींमध्ये भांडण झाल्याचे दिसून येते. पण हाणामारीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.अटक केलेले सर्व पुरुष २० वर्षांचे आहेत आणि ते उत्तराखंडच्या पौडी गढवाल जिल्ह्यातील रहिवासी आहेत, असे द टाईम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे.

नेटिझन्सच्या प्रतिक्रिया:

तथापि, नेटिझन्स प्रश्न विचारत आहेत की

केवळ तीन पुरूषांना अटक करण्यात आली आहे आणि महिलांवर कारवाई करण्यात आली नाही यावर नेटिझन्स प्रश्न उपस्थित करत आहेत. विशेष म्हणजे, व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये दोन्ही महिला पुरूषांना मारहाण आणि शिवीगाळ करताना ऐकू येत आहेत. एका व्हिडिओमध्ये एका मुलीला बेल्टने मारहाण करतानाही दिसत आहे.

“नमस्कार @DehradunPolice तुम्ही एका महिलेला मारहाण करणाऱ्या सर्व तीन मुलांना अटक केली आहे, पण त्या पुरूषाला मारहाण करणाऱ्या या महिलांवर कोणतीही कारवाई केली नाही. हा भेदभाव का?” एका एक्स वापरकर्त्याने लिहिले.

“डेहराडूनमधील सहस्त्रधाराच्या या व्हिडिओंमध्ये फक्त मुलीलाच मारहाण केली जात आहे? बेल्ट कोण वापरत आहे? कोण गैरवर्तन करत आहे?” दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटले.

पोलिस कायद्यांतर्गत तरुणांवर कारवाई करण्यात आली आणि त्यांचे वाहन एमव्ही कायद्यांतर्गत जप्त करण्यात आले.