सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सध्या मध्य प्रदेशातील असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक महिला बॅंकेत उड्या मारत नाचताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे, तर काही लोकांनी महिलेच्या अंगात देवी आल्याचा दावा केला आहे.
शुक्रवारी गुना जिल्ह्यातील एका बॅंकेमध्ये लाडली बहना योजनेसाठी एक महिला आधार लिंक करण्यासाठी गेली होती. यावेळी ती अचानक विचित्र पद्धतीने उड्या मारायला लागली. शिवाय तिने आपले केस मोकळे सोडून नाचायला सुरुवात केली. महिलेने विचित्र डान्स करायला सुरुवात करताच बॅंकेतील अधिकाऱ्यांसह तिथे उपस्थित महिला घाबरल्याचं व्हिडीओत दिसत आहे. तर काही लोकांनी या महिलेच्या अंगात देवी आली होती, असा दावा केला आहे. या विचित्र घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हेही पाहा- ऑनलाईन मिटींगदरम्यान बॅंक अधिकाऱ्याचे कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन, जोरजोरात ओरडतानाचा Video व्हायरल
मिळालेल्या माहितीनुसार, लाडली बहना योजनेसाठी केवायसी करण्यासाठी महिला बॅंकेत गेली होती. यावेळी अनेक महिला रांगेत उभ्या होत्या. यावेळी सदर महिला अचानक विचित्र हावभाव करत, केस मोकळे सोडून उड्या मारायला लागली. ती एवढ्या जोरात नाचत होती की, तिला बघून लोक तिच्या अंगात देवी आली असल्याचं म्हणू लागले. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधील महिला रांगेतून बाहेर येते आणि नाचायला सुरुवात करते, यावेळी ती मोठमोठ्याने काहीतरी बोलताना दिसत आहे. यावेळी ती नाचता नाचता अचानक खाली पडते आणि जमिनीवर हातपाय सुरुवात करते.
शिवराज सरकारच्या योजनेमुळे बँकेत प्रचंड गर्दी –
मध्यप्रदेश सरकारने लाडली बहना योजना सुरु केली आहे. या माध्यमातून शिवराज सिंह चौहान यांचे सरकार महिलांना आर्थिक सहाय्यता करणार आहे. या संबंधित शिवराज चौहान यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते, “माझा संकल्प आहे की, माझ्या बहिणींच्या डोळ्यात अश्रू नाही तर चेहऱ्यावर हसू असेल” असं म्हणताना दिसत आहेत. याच व्हिडीओला रिप्लाय देताना महिला नाचतानाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
हा व्हिडीओ मध्यप्रदेश युथ काँग्रेसच्या ट्वीटर हँडलवरून अर करण्यात आला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये, “बँकेत आधार लिंक होत नाही त्यामुळे लाडली बहना योजनेला विलंब होत असल्याने महिलेच्या अंगात देवी आली आणि तिने सरकारला शाप दिला” असं लिहिलं आहे. या योजनेमुळे बॅंकेत दररोज मोठ्या संख्येने महिला येत आहेत. आधार लिंक झालं नाही तर महिलांच्या खात्यात पैसे येणार नाहीत, त्यामुळे ही महिला अचानक नाचू लागल्याचा दावा ट्विटमध्ये करण्यात आला आहे.