Delhi viral video: सध्या धकाधकीच्या जीवनशैलीत तसा फारसा वेळ कुणालाच नाही. मग ते ड्रायव्हिंग करतानाही का असेना. कित्येक जण तर या घाईत वाहतुकीच्या नियमांचंही उल्लंघन करताना दिसतात. काही काही जण तर काय करतील याचा नेम नाही. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या एका रिक्षा चालकाने ट्रॅफिकमधून बाहेर पडण्यासाठी जबरदस्त जुगाड केला आहे. दिल्लीतील या रिक्षा चालकाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
ल्लीत मागच्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. अधिक वाहतूक कोंडी झाल्यामुळे रिक्षा चालकाने तिथल्या एका पायी चालणाऱ्या पूलावरुन रिक्षा नेली आहे. दिल्लीतील हमदर्द नगर रेड लाइट संगम विहार येथील असल्याचं एका वेबसाईटने म्हटलं आहे.त्याचबरोबर महाराष्ट्रात गणेशोत्सवाला सुरुवात झाल्यानंतर सगळीकडं गाड्यांची वर्दळ पाहायला मिळते, हे चित्र प्रत्येक वर्षीचं आहे. सध्या दिल्लीत जी-२० परिषदेची तयारी पुर्ण झाली आहे. तिथं येणाऱ्या परदेशी नागरिकांना आपल्याकडून खास सेवा देण्यात येत आहे.त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.
रिक्षाचालकाचा जबरदस्त जुगाड
त्या व्हिडीओत सगळीकडं वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामध्ये एक रिक्षा चालक अचानक तिथल्या लोकांना चालण्यासाठी असलेल्या पूलावर रिक्षा चढवत आहे. त्यावेळी त्या ब्रिजवर लोकं नसल्याचे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे त्याची रिक्षा तिथून व्यवस्थित बाहेर गेली आहे. रिक्षा चालकाचा हा स्टंट अनेकांना आवडलेला नाही.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> वाढदिवस ठरला ‘काळ’! बर्थडे पार्टीवरुन घरी येताना २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू; पाहा CCTV फुटेज
रिक्षाचालक ताब्यात
या व्हिडीओवर नेटकरी संमिश्र प्रतिक्रिया देत असून व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोक सोशल मीडियावर पोलिसांनी टॅग करत या रिक्षा चालकावर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. यानंतर या रिक्षाचाकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची रिक्षाही जप्त केली आहे.