Viral Video: चोरांसाठी पाकीटचोरी हा पैसे मिळविण्याचा एक सोपा मार्ग आहे. रेल्वेस्थानका वा ट्रेनमध्ये प्रवाशांच्या, तसेच बाजारात, मॉलमध्ये गर्दीचा फायदा घेत, अनेकांच्या खिशातून गुपचूप पाकीट काढून चोरटे पसार होतात. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी नागरिकांना आपल्या सामानावर त्याची चोरी होऊ नये यासाठी विशेष लक्ष ठेवावे लागते. पाकीटमारांचे अनेक व्हिडीओ तुम्ही आजवर पाहिले असतील. पण, आज असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ; ज्यात चक्क व्यक्तीचे पाकीट चोरून त्यालाच मारहाण केली जाते आहे. नक्की काय घडलं या लेखातून सविस्तर जाणून घेऊ.

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत ही घटना घडली आहे. बसमध्ये पाकिटमारांच्या एका ग्रुपने प्रवेश केला आणि बसमध्ये असलेल्या एका प्रवाशावर हल्ला केला. त्याला क्रूरपणे मारहाण केली आणि गाडीच्या बाहेर ढकलून दिले. पाकीटमार ग्रुप आणि हल्ला केलेल्या प्रवाशात झालेल्या प्रसंगामुळे बसमधील अनेक प्रवासी अस्वस्थ दिसले. बसमध्ये बसवलेल्या सीसीटीव्ही यंत्राद्वारे किंवा प्रवाशांच्या साक्षीने ही घटना कॅमेऱ्यात रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे. दिल्लीत घडलेली ही घटना एकदा व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा…VIDEO: भारतीय तरुणाची कमाल! होंडा कारचे केलं आलिशान लॅम्बोर्गिनीमध्ये रूपांतर; खर्च ऐकून व्हाल थक्क

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, धावत्या बसमध्ये सुमारे चार ते पाच जण एका व्यक्तीसं ओढताना दिसत आहेत. विचित्र पद्धतीत मारहाण सुरु आहे. मारामारीच्या वेळी त्यांनी व्यक्तीचं जाकीट काढून टाकले आहे आणि त्याचे केस ओढत, जॅकेट ओढत , हिंसक कृत्य करताना त्याला लाथ बुक्क्यांनी मारहाण करतानाही दिसले आहेत. एवढंच करून ही पाकीटमार करणारा ग्रुप थांबला नाही तर स्वतःसह पाकीट मारणाऱ्या व्यक्तीस सुद्धा बसमधून घेऊन बाहेर पडले आणि रस्त्यावरही ही हाणामारी सुरूच राहिली.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @DELHIBUSES1 आणि @PrathamWaidande या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला होता. तसेच कॅप्शनमध्ये ‘मी संपूर्ण देशाला विनंती करतो की, #दिल्ली बसच्या प्रवाशांना वाचवा, पहा, एका प्रवाशाला बेदम मारहाण करत त्यांनी त्याला बसमधून बाहेर काढले.दिल्लीच्या बस पाकिटमारांनी ताब्यात घेतला आहे’ ;अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. अनेक नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ रिपोस्ट केला आहे आणि पोस्टमध्ये दिल्लीच्या अधिकाऱ्यांना टॅग केलं आहे आणि लक्ष घालण्याची विनंती केली आहे.

Story img Loader