Shocking video: सोशल मीडियावर सतत विविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यापैकी काही व्हिडीओ पाहून खरंच अवाक् व्हायला होतं. कधी कोणी बसमध्ये गाणी गाताना दिसतात तर कधी कोणी बसमध्ये डान्स करताना दिसतात. कधी सीटवरून दोन प्रवाशांमध्ये वाद पेटतो तर कधी सुट्ट्या पैशांवरून प्रवासी कंडक्टर एकमेकांबरोबर भांडताना दिसतात. सध्या असाच एक पार चक्रावून टाकणारा व्हिडीओ समोर आला आहे. या प्रकरणामध्ये बस कंडक्टर आणि एका महिलेमध्ये वाद झालेला आहे, मात्र ही महिला मर्यादा सोडून भांडण करत असल्याचं दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हा कंडक्टर महिलेशी संवाद साधतोय, पण दुसरीकडे ती महिलेनं कंडक्टरबरोबर बोलताना मर्यादाच ओलांडली. तिनं थेट “ऐ जास्त बोललास तर तुझी नोकरी मी खाऊन टाकेन” अशी नोकरीवरून काढण्याची धमकी दिली. हा व्हिडीओ आता तुम्ही देखील पाहा, अन् सांगा या भांडणात नेमकी चूक कोणाची होती?

भांडणात नेमकी चूक कोणाची होती?

ही सर्व घटना दिल्लीतील रोहिणी सेक्टर १८ मध्ये घडली आहे. हा व्हायरल व्हिडीओ एका चालत्या एसटी बसमधील आहे. दिल्ली ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या एका बसमध्ये कंडक्टर आणि महिलेचं भांडण झालं. चालकानं सँडवर योग्य ठिकाणी बस न थांबवल्यानं भांडण सुरु झालं, या महिलेचा असा आरोपी आहे की, महिलेला पाहून मुद्दाम बस पुढे नेली. यावरुनच ती कंडक्टबरोबर वाद घालत आहे. पण कंडक्टर काही आरोप मान्य तयार नव्हता. त्यानं उलट महिलेचे आरोप फेटाळत बसमधील इतर प्रवाशांनाच खरं खोटं विचारलं. यावर सर्व प्रवासी कंडक्टरच्या बाजूनं बोलू लागले. हे सगळं पाहून महिलेला राग अनावर झाला आणि तिने थेट त्याला नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली. तुझी नोकरी मी खाऊन टाकीन अन् तू काहीच करू शकणार नाही अशा शब्दात त्याला धमकावू लागली.

पाहा व्हिडीओ

https://twitter.com/Haqikat_Aap_Tak/status/1847501507953905882

हेही वाचा >> “एका बापाची घालमेल” लेकीची पाठवणी करताना वडील धायमोकलून रडले; VIDEO पाहून प्रत्येक मुलीच्या डोळ्यात येईल पाणी

हा व्हिडीओ सोशल मीडियावर marathi_royal_karbhar या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला लाखोंमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत. तर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की, “महिलांसाठी बनवलेल्या कायद्यांचा उद्देश महिलांची सुरक्षा सुनिश्चित करणे हा आहे, परंतु त्यांचा गैरवापर करून खोटे आरोप केले जात असतील तर ते कायद्याविरुद्ध आहे.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi bus viral video woman threatened to fire the conductor from his job due to a verbal fight with her shocking video goes viral srk