Accident video: दिल्लीतून एका अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे, जो तुम्हाला हादरवून सोडेल. एका भरधाव कारने रस्त्याच्या कडेला चालणाऱ्या एक तरूण आणि एक तरुणीला धडक दिली, ज्यामध्ये तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तरुण आणि एक तरुणी फूटपाथवरून चालताना दिसत आहेत. यावेळी अचानक एक अनियंत्रीत कार येते आणि त्यांना धडक देते. या घटनेनंतर काही वेळातच रस्त्याने जाणाऱ्यांनी जखमींना मदत करण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. अहवालानुसार त्यापैकी एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. हे दोघे विद्यार्थी असल्याचे सांगण्यात येत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, संपूर्ण रस्ता रिकामा आहे. गाड्यांची जास्त वर्दळही रस्त्यावर दिसत नाहीये. अशातच फूटपाथवर दोन विद्यार्थी चालताना दिसत आहेत. सगळं व्यवस्थित दिसत असताना अचानक एक कार येते अन् थेट फूटपाथवर धडकते. याच धडकेत हे विद्यार्थी गंभीर जखमी होतात तर एकाचा मृत्यू झालाय. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: मुक्या जनावराला कळलं, माणसाला कधी कळणार? ताडोबात नयनतारा वाघिणीने शिकवली पर्यटकांना अद्दल

अपघातांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. दरम्यान, पश्चिम दिल्लीतील कीर्ती नगर भागातही एक भीषण अपघात झाला. यामध्ये दोन कार समोरा-समोर धडकल्यामुळे हा अपघात झाला. कारच्या या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली. पोलिसांनी सांगितले की, बुधवारी सायंकाळी ५.४९ च्या सुमारास दोन कार दुभाजकावर आदळल्याने एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.

“पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना वंश जॉली नावाचा एक व्यक्ती ड्रायव्हरच्या सीटवर मृतावस्थेत पडलेला आढळला. जॉली हा मानसरोवर गार्डन परिसरात राहणारा होता. दुसरी कार चालवणाऱ्या व्यक्तीचे नाव राजेश अरोरा असे होते, तो देखील उपस्थित होता. अधिकाऱ्याने पुढे सांगितले की घटनास्थळी गुन्हे आणि फॉरेन्सिक पथकांना पाचारण करण्यात आले होते. “बीसीडी चौकाच्या दिशेने हा अपघात झाला आणि कीर्ती नगर पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू करण्यात आला आहे,” अधिकाऱ्याने सांगितले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi college student dies on spot as speeding car knocks down pedestrians walking on footpath in patel nagar shocking cctv footage surfaces srk