आपल्याकडे नृत्यकलेला वाव देण्यासाठी विविध वाहिनीवर नृत्याचे कार्यक्रम घेतले जातात. या कार्यक्रमामधील नृत्य पाहून आपण चक्रावून जातो. पण दिल्लीकरांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जो नृत्याचा आनंद घेतला तो खरच अप्रतिम असा होता. दिवाळीच्या सुट्टीसाठी शॉपिंगला घराबाहेर पडलेल्या दिल्लीकरांना एका फुगेवाल्याने आपल्यातील नृत्य कला सादर करुन दाखवली. त्याने सादर केलेल्या कलेने रस्त्यावरुन जाणारा प्रत्येकजण या कलेला दाद देताना दिसला. विशेष म्हणजे रस्त्यावर फुगेविकणाऱ्या मुलाचे नृत्य पाहण्यासाठी उच्चप्रभू वस्तीतील लोकांनी गर्दी केल्याचे दिसले. दिल्लीकरांनी या फुगे विकणाऱ्या मुलाला दिलेली दाद हसीबा बी अमीन या महिलेने आपल्या कॅमेरात कैद कली. एवढेच नाही तर आपल्या अधिकृत शेअर देखील केली.

कोणाच्याही मार्गदर्शनाशिवाय स्वत: केलेल्या कोरिओग्राफीने या फुगेवाल्या मुलाने दिल्लीकरांची मने जिंकली. अमीन यांनी केलेल्या चित्रिकरणाबद्दल किंवा ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओबद्दल या मुलाने कोणतेही मानधनाची अपेक्षा केलेली नाही. त्याने फक्त आपल्यातील कसब मनमुरादपणे सादर करण्यावर भर दिला आहे. अमीन यानी हा व्हिडिओ शेअर करताना या मुलाला योग्य व्यासपीठ मिळवून देण्यास मदतीचे आवाहन केले आहे. त्यांच्या या आवाहनानंतर नेटीझन्सकडून देखील समर्थन मिळताना दिसत आहे. या व्हिडिओला लोक अधिक प्रमाणात सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करताना दिसत आहेत.

या व्हिडिओच्या माध्यमातून एखाद्याच्या अंगी कला असून देखील  परिस्थितीमुळे कला कशी  झाकाळली जाते हे समोर येते. पण परिस्थितीला दोष न देता आपल्या अंगी असणारे कसब लोकांसमोर सादर करुन या मुलाने आपली आवड जागृत ठेवल्याचे दिसून येते.

Story img Loader