Viral Video: चोरांसाठी पाकीटचोरी हा पैसे मिळविण्याचा एक सहज सोपा मार्ग आहे. पाकीटमारांचे अनेक व्हिडीओ तुम्ही आजवर पाहिले असतील. रेल्वेस्थानका वा ट्रेनमध्ये प्रवाशांच्या, तसेच बाजारात, मॉलमध्ये गर्दीचा फायदा घेत, अनेकांच्या खिशातून गुपचूप पाकीट काढून चोरटे पसार होतात. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी नागरिकांना आपल्या सामानावर त्याची चोरी होऊ नये यासाठी विशेष लक्ष ठेवावे लागते. सार्वजनिक परिसरात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे व पोलिससुद्धा अशा भुरट्या चोरांवर २४ तास लक्ष ठेवून असतात. दिल्लीच्या सदर बाजारातसुद्धा अशीच एक घटना घडली आहे.
दिल्लीच्या सदर बाजारात एक अज्ञात व्यक्ती दुचाकीस्वाराचे पाकीट चोरण्याचा प्रयत्न करताना दिसली आहे. प्रकरण असे आहे की, मार्केटमध्ये एक अज्ञात व्यक्ती दुचाकीस्वारास वाहन सुरू करण्यास मदत करायला जाते. मदतीच्या बहाण्याने ती व्यक्ती दुचाकीस्वाराचे पाकीट चोरण्याचा प्रयत्न करताना दिसते आहे. चोरटा पाकीट चोरण्याच्या प्रयत्नात असतानाच तेथील पोलीस ठाण्याच्या शिपायाची नजर त्या व्यक्तीवर पडते आणि संपूर्ण दृश्य कॅमेऱ्यात कैद होते. एकदा तुम्हीसुद्धा पाहा हा व्हायरल व्हिडीओ.
हेही वाचा…अवघ्या एका सेकंदात सोडवून होणार रुबिक क्यूबचे कोडं; पट्ठ्याचा जबरदस्त उपाय VIDEO तून पाहा
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, दिल्ली पोलीस शिपाई सचिन यांनी चोराला रंगेहाथ पकडले आहे. पाकीट चोरण्याचा प्रयत्न करताच सचिन मागून धावत येतात आणि त्याची कॉलर पकडून त्याला थांबवतात. मग त्याच्या विरोधात कारवाई करतात. दिल्ली पोलिसांनी या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत चोरट्यावर कारवाई केली आहे. यासंबंधीच्या दृश्याचे या व्हिडीओत संकलन केले गेले आहे. तसेच कॅप्शनमध्ये या घटनेची थोडक्यात माहिती दिली आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ दिल्ली पोलिसांच्या @DelhiPolice या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला एक लाख ६० हजारांपेक्षा व्ह्युज आहेत. नेटकरी व्हिडीओ पाहून शहरात अशा प्रकारचे गुन्हे घडू नयेत यासाठी पोलिसांचे महत्त्व पटवून देताना दिसत आहेत. तर काही जण दिल्ली पोलीस शिपाई सचिन यांचे कौतुक करीत दिल्लीला अशा पोलिसांची गरज आहे, असे आवर्जून सांगताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत. एकूणच सोशल मीडियावरील या व्हिडीओने अनेकांच लक्ष वेधून घेतले आहे.