Delhi Dead Man Alive: नातेवाईकांनी आजोबांना मृत समजून अंत्यसंस्काराची तयारी केली. रुढी परंपरेनुसार सर्व विधीही पार पाडले. तिरडीवर ठेवून स्मशानभूमीत नेण्यात आलं. लाकडांचे पडलेले ढीग, रचलेले सरण, अंत्यसंस्कारासाठी ठेवण्यात आलेला मृतदेह असं चित्र संपूर्ण स्मशानभूमीत होतं. प्रेत सरणावर ठेवून शेवटचा विधी पार पडणार तोच आजोबा जिवंत झाले. यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. प्रेत सरणावर ठेवून फक्त तोंड उघडं ठेवण्यात आलं होतं. दरम्यान आजोबांचे डोळे उघडल्यानं मुखाग्नी टळला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दिल्लीतल्या नरेलामध्ये ही एक विचित्र घटना घडली आहे. टिकरी खुर्द गावातील ६२ वर्षीय सतीश भारद्वाज यांचा रविवारी सकाळी मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीय त्यांचं ‘प्रेत’ घेऊन स्मशानभूमीत पोहोचले तेव्हा दुपारी तीनच्या सुमारास या आजोबांचे डोळे उघडेपर्यंत श्वासोच्छवास सुरू झाला. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, या आजोबांना कर्करोग होता. त्यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. रुग्णालयात त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र व्हेंटिलेटरवरून काढताच त्यांचा श्वास थांबला. त्यांचा मृत्यू झाला असं कुटुंबीयांना वाटलं. त्यानंतर त्यांना घरी आणून त्यांच्यावरील अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत नेण्यात आलं. मात्र पुढे जे घडलं ते एका चमत्कारापेक्षा काही कमी नव्हतं.

आणखी वाचा : किती गोड! हत्तीच्या पिल्लाला बर्फात खेळताना पाहून नेटकरी म्हणाले सगळा ताण विसरलो, पाहा VIRAL VIDEO

आजोबांना मेलेलं समजून त्यांना चितेवर नेण्यास सुरुवात केली. त्यांच्या चेहऱ्यावरील कपडा काढण्यात आला तेव्हा त्यांचा श्वास सुरू असल्याचं दिसून आलं. इतकंच काय तर आजोबांनी त्यांचे डोळे सुद्धा उघडले, हे पाहून साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. रचलेल्या सरणावर ते निपचित पडले होते. यानंतर नातेवाईंकांनी त्वरित आजोबांना सरणावरून काढलं आणि त्यानंतर तात्काळ पोलिस आणि रुग्णवाहिका बोलावण्यात आली. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. हा घडलेला प्रकार पाहून नातेवाईकांना त्यांच्या डोळ्यावरच विश्वास नाही बसला.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : धावती ट्रेन पकडत असताना तोल गेला, मग झालं असं काही की तुम्हीही म्हणाल चमत्कार!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : सासरी जाताना नवरीचा असा अवतार पाहून साऱ्यांना धक्का बसला, मग माहेरच्यांनी काय केलं ते पाहाच

धक्कादायक प्रकरणाच्या तपासात पोलीस गुंतले
घटनास्थळी पोहोचलेल्या डॉक्टरांनीही आजोबा श्वास घेतल्याची खात्री केली. हृदयाची धडधड, नाडी चाचणीत अगदी सामान्य आढळली. त्यानंतर आजोबाला जवळच्या हरिश्चंद्र रुग्णालयात दाखल करण्यात आलं. स्मशानभूमीतून पीसीआर कॉल आल्याची माहिती पोलिसांनी दिली. सतीश भारद्वाज नावाचे ६२ वर्षीय आजोबा अचानक जिवंत झाल्याचं पोलिसांना सांगण्यात आलं. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

प्राथमिक तपासात रुग्णालयाचा निष्काळजीपणा समोर आलेला नाही. नातेवाइकांच्या सांगण्यावरून त्यांना व्हेंटिलेटरवरून काढल्यानंतर आजोबांचा श्वासोच्छवास थांबला होता, अशी माहिती मिळाली आहे. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचं कुटुंबीयांना वाटलं आणि मृत्यूनंतर कुटुंबीय अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत गेले, मात्र स्मशानभूमीत आजोबांचा श्वासोच्छवास सुरूच होता.