Bus Driver Viral Video: सध्या थंडी खूप वाढली आहे. कडाक्याच्या थंडीत शरीर उबदार ठेवण्यासाठी अनेकजण वारंवार चहा पिताना दिसतात. अशा परिस्थितीत, नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एका बसचालकाला चहा पिण्याची तल्लफ झाल्यावर त्याने भर रस्त्यावर बस थांबवली आणि संपूर्ण रस्त्यावरची वाहतूक ठप्प केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
आपल्या आजूबाजूला अशी अनेक लोक असतात जी चहा प्रेमी असतात. चहा पिण्यासाठी ही लोकं काहीही करू शकतात. सध्या सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल होतोय तो एका चहाप्रेमीचा आहे. या व्हिडिओमध्ये एक ड्रायव्हर रस्त्याच्या मधोमध बस थांबवून चहा घेण्यासाठी जाताना दिसत आहे. बस रस्त्यावर अचानक थांबल्यामुळे मागून येणारी वाहने थांबतात आणि त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गाड्यांची गर्दी होते.
येथे पाहा व्हिडिओ
हा व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे. Shubh नावाच्या एका ट्विटर युजरने आपल्या प्रोफाइलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये बस चालकाच्या या कृतीमुळे रस्त्यावर अडकलेले लोक सतत हॉर्न वाजवताना दिसत आहेत. जे पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू आवरणार नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर यूजर्सचे लक्ष वेधण्यात यशस्वी ठरत आहे. या व्हिडिओला सोशल मीडियावर ६६ हजारांहून अधिक व्ह्यूज आणि ३ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.