Delhi Earthquake Fact Check Video: देशाची राजधानी नवी दिल्ली आणि एनसीआरमध्ये आज पहाटेच्या सुमारास जोरदार भूकंपाचे धक्के बसले. प्रथम दिल्ली-एनसीआरमध्ये पहाटे ५ वाजून ३० मिनिटांनी आणि नंतर बिहारमध्ये सकाळी ८ च्या सुमारास भूकंपाचे हादरे जाणवले. या भूंकापाची तीव्रता ४.० रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. या तीव्र भूकंपामुळे दिल्ली, नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमधील उंच इमारतींमध्ये राहणारे रहिवासी जीव वाचवण्यासाठी घराबाहेर धावत सुटले. यामुळे दिल्ली एनसीआरसह आजूबाजूच्या परिसरातही भीतीचे वातावरण पसरले आहे. या भूकंपासंदर्भात अनेक बातम्या आणि सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर केल्या जात आहेत.

अशात तीव्र भूकंपाच्या घटनेसंदर्भात एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. या व्हिडीओत तीव्र भूकंपाचे धक्के जाणवत असतानाचे लाईव्ह दृश्य दिसतेय. एका बंगल्याबाहेरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये भूंकपाची ही घटना कैद झाली आहे. दरम्यान, हा व्हिडीओ नवी दिल्लीत आज झालेल्या भूकंपाच्या घटनेचा असल्याचा दावा करत व्हायरल केला जात आहे. पण, खरंच व्हायरल व्हिडीओ नवी दिल्लीतील भूकंपाच्या घटनेचा आहे का याविषयीचे सत्य जाणून घेऊ…

काय होत आहे व्हायरल?

एक्स युजर अनु शर्मा यांनी कॅप्शनमध्ये दिल्ली आणि भूकंप या हॅशटॅगसह व्हायरल व्हिडीओ शेअर केला.

इतर युजर्सदेखील त्याच दाव्यासह व्हिडीओ शेअर करत आहेत.

तपास:

काही एक्स प्रोफाइलने व्हिडीओ जिथून घेतला होता त्या प्रोफाइलची तपासणी करून आम्ही तपास सुरू केला.

व्हिडीओ प्रथम मुहम्मद अब्दुल्ला हाश्मी यांनी शेअर केला होता.

व्हिडीओसह वापरलेला हॅशटॅग इस्लामाबाद होता.

हा व्हिडीओ Rasala.pk ने त्यांच्या X हँडलवरदेखील शेअर केला होता.

पुढे, आम्ही व्हिडीओमधून मिळालेल्या कीफ्रेमवर दाखवलेली तारीख तपासली, ती तारीख १५ फेब्रुवारी २०२५ होती, वेळ २२:४८:१५ होती.

image.png

अहवालांनुसार, इस्लामाबादमध्ये १५ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री ११:१८ वाजता भूकंप झाला होता.

https://tribune.com.pk/story/2528769/strong-earthquak-shakes-rawalpindi-and-islamabad-sparking-panic
https://www.geo.tv/latest/590872-48-magnitude-earthquake-jolts-islamabad-rawalpindi-and-parts-of-ajk

दरम्यान, सोमवार, १७ फेब्रुवारी २०२५ रोजी पहाटे नवी दिल्लीत भूकंप झाला.

निष्कर्ष :

नवी दिल्लीत भूकंपाचे लाईव्ह दृश्य असा दावा करत व्हायरल होणारा सीसीटीव्ही फुटेज व्हिडीओ प्रत्यक्षात पाकिस्तानातील इस्लामाबादमधील आहे. पाकिस्तानातील रावळपिंडी आणि इस्लामाबाद या शहरांत १५ फेब्रुवारी २०२५ रोजी ४.८ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के जाणवले. याच भूकंपाच्या घटनेचे लाईव्ह सीसीटीव्ही व्हिडीओ दिल्लीतील भूकंपाचे असल्याचा खोटा दावा करत शेअर केले जात आहेत.

Story img Loader