Shocking video: भारताची राजधानी असण्यासोबतच दिल्ली गुन्हेगारीची राजधानीही बनली आहे. देशाची राजधानी दिल्ली हळूहळू गुन्हेगारी क्षेत्राची राजधानी बनत चालली आहे. गेल्या काही वर्षांपासून दिल्लीतील गुन्हेगारीचा आलेख चढताच राहिला आहे. दिल्लीत रोज अनेक घटना उघडपणे घडताना दिसतात. शहरातील रस्त्यांवर लूटमारीच्या, चोरीच्या गुन्ह्यांची संख्या वाढतच चालली आहे. चोर चोरी करण्यासाठी नवनवीन आयडीया घेऊन येत असतात. कितीही चलाख चोर असुदेत पोलीस चोराला शोधून काढतातच. तरीही चोऱ्यांचे प्रमाण काही कमी होत नाही. चोरट्यांच्या मनातून पोलिसांची भीती पूर्णपणे नाहीशी झालेली दिसते. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, यामध्ये बाईकवरून आलेल्या चोरांनी एका वृद्ध व्यक्तीचूी रस्ता विचारण्याच्या बहाण्याने लूटलं आहे. याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा