Delhi Farmers Protest Viral Photo: किमान आधारभूत किमतीसाठी कायदा करण्याच्या प्रमुख मागणीसाठी पंजाब आणि हरियाणातील हजारो शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा राजधानी दिल्लीच्या दिशेने निघाले आहेत. अशातच लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट मोठ्या प्रमाणावर शेअर केली जात असल्याचे आढळले. यात असा दावा केला होता की २५ हजाराहून अधिक शेतकरी आणि ५००० ट्रॅक्टर दिल्लीला पोहोचण्याच्या मार्गावर आहेत. या आंदोलनाच्या आधी दिल्लीत अनेक ठिकाणी सुरक्षा बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. व्हायरल पोस्टमध्ये एक ट्रॅक्टर दिसत आहे ज्यामध्ये हायड्रॉलिक टूल्स बसवण्यात आले आहेत या टूल्समुळे बॅरिकेड्स तोडून टाकण्यात येतील तसेच अश्रुधुराच्या नळकांड्यांचा सामना करण्यासाठी अग्निरोधक हार्ड-शेल ट्रेलर्स सज्ज आहेत, असेही पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आंदोलकांनी सुधारित वाहनांसह सराव कवायती केल्याचेही पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. या ट्रॅक्टरचा फोटो सुद्धा सध्या व्हायरल होत आहे. नेमकं या फोटोचं सत्य काय हे जाणून घेऊया.

काय होत आहे व्हायरल?

X युजर Megh Updates ने व्हायरल हिटर प्रोफाइल वर पोस्ट केली.

इतर वापरकर्ते देखील समान दाव्यांसह हेच फोटो शेअर करत आहेत.

तपास:

पोस्ट्ससह ANI वृत्तसंस्थेची लिंक होती. आम्ही दिलेली लिंक तपासली आणि त्यातील मजकूर वाचला.

https://www.aninews.in/news/national/general-news/modified-tractors-to-lead-farmers-protest-march-intelligence-agencies-alert-police20240211133206/

या बातमीत पोस्टसह शेअर केलेला व्हायरल फोटो नव्हता. आम्हाला हा फोटो एका अन्य बातमीत आढळली.

https://bnnbreaking.com/world/central-ministers-meet-farmers-ahead-of-delhi-chalo-protest

पण, एका बातमीत स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते की सदर फोटो हा प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरण्यात आला असून तो AI निर्मित आहे.

Tractors modified to remove barricades, resist tear gas shells will lead Delhi Chalo march by Punjab farmers, intelligence agencies alert police

आम्ही HIVE मॉडरेशन, या एआय इमेज डिटेक्टरमध्ये सुधारित ट्रॅक्टरचा फोटो देखील अपलोड केला. या टूल ने सुचवले की इनपुट AI निर्मित आहे.

हे ही वाचा<< भाजपातही नेत्यांच्या पक्षबदलाचे संकेत? केंद्रीय मंत्र्यांनी हातात ब्रश घेऊन रेखाटलेलं चित्र व्हायरल, नक्की झालं काय?

निष्कर्ष: दिल्लीतील शेतकरी आंदोलनात वापरल्या जाणाऱ्या सुधारित ट्रॅक्टरचा व्हायरल फोटो AI निर्मित आहे. व्हायरल फोटो खरा नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi farmer protest tractors dangerous look that will break barricades tear gas will fail due to technology but photos are ai made svs
Show comments