एक भटक्या कुत्र्याला तीन दिवसांपेक्षा जास्त काळासाठी गटारामध्ये एक कुत्रे अडकले होतो. या कुत्र्याला गटारातून दिल्लीच्या अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्याने बाहेर काढून त्याचे प्राण वाचवले आहे. दिल्लीमध्ये ग्रीन पार्कमध्ये ही घडना घडली. रस्त्यावर कुत्र्याचा रडण्याचा आवाज ऐकल्यानंतर लोकांनी अग्निशामक दलाला कळवले. माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी बचाव मोहिम सुरू केली. बचाव मोहिमेचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

व्हिडीओनुसार, तुटलेल्या चेंबरमधून कुत्रा गटारात पडल्यानंतर बाहेर पडू शकला नाही. त्यानंतर, कुत्र्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला वाचवण्यासाठी रस्त्यावर ड्रिल केले. एका मिनिटाच्या व्हिडीओनुसार, अधिकाऱ्यांनी रस्ता तोडण्यासाठी अनेक उपकरणे वापरली आणि नंतर रस्त्यातील दगड हाताने काढले. काही मिनिटांनंतर त्यांना कुत्र्याचा आवाज ऐकू आला. त्यानंतर अग्निसुरक्षा अधिकाऱ्याने कुत्र्याला बाहेर काढले आणि खाण्यापिण्यास दिले.

Two youths died after drowning in a tank in Bhalivali vasai news
भालिवली येथील कुंडात बुडून दोन तरुणांचा मृत्यू
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
A video of a leopard entering the garden of a house in Mount Abu
थेट घरात घुसला बिबट्या अन् बागेत फिरणाऱ्या कुत्र्यावर मारली झडप; थरारक घटनेचा Video Viral
pets cats
पाळीव प्राण्यांच्या विरहाच्या भीतीने नैराश्य, तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
Maharani Laxmi Bai Medical College, in Jhansi district
Jhansi Hospital Fire : नर्सने काडीपेटी पेटवली अन्… १० अर्भकांचा जीव घेणाऱ्या झाशी रुग्णालयात आग कशी लागली?
Hadapsar fire
Video: पुण्यातील हडपसर भागातील जुन्या इमारतीत आग, लहान मुलांसह सात रहिवाशांची सुटका
Victims of bulldozer action in UP welcome SC verdict
‘बुलडोझर’ निकालाचे उत्तर प्रदेशातील पीडितांकडून स्वागत; नुकसानभरपाईच्या मागणीसाठी न्यायालयात जाण्याचे संकेत

हेही वाचा – डॉ. अक्षता कृष्णमुर्ती ठरली मंगळ ग्रहावर रोव्हर चालवणारी पहिली भारतीय नागरिक; जाणून घ्या तिचा प्रेदणादायी प्रवास


हेही वाचा – “सॉफ्टवेअर जॉब सोडा आणि चांदणी चौकात लेहेंगा विका” तरुणाच्या पोस्टवरून सोशल मीडियावर पेटला नवा वाद

लोकांनी केले अग्निशामक दलाचे कौतूक
व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, दिल्ली फायर सर्व्हिसच्या नायकांनी ३ दिवसांपासून गटारात अडकलेल्या एका कुत्र्याला वाचवले आहे. एका आठवड्यापूर्वी शेअर केलेल्या या व्हिडीओला एक लाखांपेक्षा जास्त लोकांनी पसंती दर्शवली आहे तर तीन मिलियन पेक्षा जास्त लोकांनी पाहिजे आहे. एकाने लिहिले की, हे खरे हिरो आहेत , देव त्यांना आशिर्वाद देवो.” दुसऱ्याने लिहले, “सलाम” तिसऱ्याने लिहिले,” ही गोष्ट शेअर केल्याबद्दल धन्यवाद! मोटू हा माझा सार्वजनिक कुत्रा आहे आणि त्याला मी, माझे कुटुंब आणि मनोज भैया (भाजीविक्रेता) खायला देतो, आम्ही त्याच्या मित्रांची (माईटी आणि जॅकी) यांचीही काळजी घेतो. मोटू आता बरा आहे आणि काही दिवस निरिक्षणात आहे कारण तो म्हातारा कुत्रा आहे. मोटूला मदत करणाऱ्या सर्वांचे आभार.”