आपण सोशल मिडियावर कित्येक व्हिडीओ पाहतो जे आपल्या चेहऱ्यावर अलगद एक हास्य घेऊन येतात. कित्येक लोक कोणताही संकोच न बाळगता मनापासून नाचतात आणि आनंद पसरवतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचा आजचा दिवस नक्कीच सार्थकी लागेल.

इंडिया टुडेसाठी डिजिटल कन्टेट प्रोड्युसर म्हणून काम करणाऱ्या अनिष्का अवस्थी हिने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे जो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील असून यामध्ये अनिष्का एका बेघर महिलेसह बिनधास्तपणे नाचताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही दोघींना मनापासून नाचताना पाहू शकता आणि शेवटी अनिष्का त्या महिलेची गळाभेट घेताना दिसत आहे.

shocking video
Video : “जीव एवढा स्वस्त असतो का?” रिल बनवण्यासाठी तरुणीने केला उंच झाडाच्या शेंड्यावर चढून डान्स, व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
mother in law and daughter in law dance on marathi song kakhet kalasa gavala valsa kashala song video
नशीबवान सून! सासू सासऱ्यांचं प्रेम पाहून प्रत्येक मुलगी म्हणेल “असंच सासर हवं”; VIDEO चं सर्वत्र होतंय कौतुक
Ladies group dance on Gan Bai Mogra Ganachi Saree marathi song video goes viral on social media
“गण बाय मोगरा गणाची साडी” चाळीतल्या महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून म्हणाल ‘हौस असेल तर वेळ मिळतो’
या महिला कधी सुधारणार? फक्त हात लागला म्हणून जोरदार बाचाबाची; इंग्रजीत सुरु झालेलं भांडण हिंदीवर गेलं, VIDEO पाहून पोट धरुन हसाल
school students couple dance so gracefully on marathi song
“माझं काळीज लागलंय नाचु न गानं वाजू दया” जिल्हा परिषद शाळेत चिमुकल्यांनी जोडीने केला भन्नाट डान्स; VIDEO होतोय व्हायरल
video of marathi ukhane
Video : “…राव आहे अजय देवगण तर मी आहे रविना टंडन” विदर्भातील महिलांनी घेतले भन्नाट उखाणे
video of a young girl dance on 26 January
Video : “अशा शाळांवर कारवाई केली पाहिजे” २६ जानेवारीला तरुणीने सादर केलेला डान्स पाहून नेटकरी संतापले

हेही वाचा – रस्त्यावर उभ्या उभ्या कलाकाराने रेखाटलं फुल विक्रेत्या आजीचं चित्र, पाहताक्षणी उमटले चेहऱ्यावर हसू; पाहा Video

“दिल्ली सुंदर आहे. तुम्हाला सर्व प्रकारचे लोक भेटतात. आणि, सर्वोत्कृष्ट ते आहेत जे कोणीही तुमच्यासह नाचू लागतात.”असे कॅप्शन अनिष्काने तिच्या व्हिडीओला दिले आहे.

या डान्स व्हिडीओबाबत बोलताना अनिष्काने सांगितले, “आम्ही कॅनॉट प्लेसमधील वेअरहाऊस कॅफेमधून बाहेर पडलो आणि म्युझिक अजूनही जोरात वाजत होते. दोन मुलं कॅफेच्या बाहेर हातात फुगे घेऊन नाचत होती. आम्ही त्यांच्यासोबत नाचू लागलो आणि तेवढ्यात ती महिला आली आणि आमच्यासोबत नाचू लागली. ते खूप गोंडस होते.आम्ही नाचलो आणि मग मिठी मारली. शेवटी तिने विचारले की मी तिला पैसे देऊ शकतो का? माझ्याकडे रोख रक्कम नव्हती पण माझ्या एका मैत्रिणीकडे काही होते, आम्ही ते तिला दिले आणि ती निघून गेले.

हेही वाचा – Google Doodle : ही पाणी पुरी खायची नाही तर खेळायची; जाणून घ्या कसा खेळायचा ‘हा’ मजेशीर गेम

ही पोस्ट आतार्यंत १३४ हजारपेक्षा जास्त लोकांनी पाहिले असून अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काही लोकांनी इतका सुंदर व्हिडी शेअर केल्याबद्दल अनिष्काचे आभार मानले आहे.

तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला?

Story img Loader