आजकाल रिलेशनशिप आणि ब्रेकअप होणे सामान्य गोष्ट आहे. कधी कधी नात्यात दोघात तिसरा व्यक्ती येते नाते तुटते. सोशल मीडियावर अशाच एका नात्याचा किस्सा चर्चेत आला आहे. ब्रेकअपची ही गोष्ट वाचून तुम्ही हसू आवरू शकणार नाही कारण या गोष्टीतील खलनायक एक मच्छर आहे. होय तुम्ही योग्य तेच ऐकत आहात. एक किशोरवयीन मुलींनी एक आपली प्रेमकथा आणि ब्रेकअपचा मजेशीर किस्सा सांगितला आहे जो आता व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे तरुणीला बॉयफ्रेंड गमावल्याचे दुख नाहीये तर एका मच्छरची भिती वाटत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झाली हटके प्रेमकथा
किशोरवयीन मुलीची प्रेमकथा आणि ब्रेकअपचा किस्सा रेडीटवर @Real-Level-5779 नावाच्या अकांउटवरून शेअर केला आहे. मुलीने सोशल मीडियावर लिहिले की तिला डेटिंग रिलेशनशमध्ये पडायचे नव्हते पण एका जीवलग मित्र सतत तिला डेटिंगसाठी विचारत होता आणि तिने त्याला होकार दिला. तिच्या विनोदी शैलीत लिहिताना, १६ वर्षीय तरुणीने पुढे लिहिले, रिलेशनशिपमध्ये आल्यावर ‘मी पाठवलेल्या प्रत्येक रीलकडे दुर्लक्ष करत होता’, ‘मी BTS पाहताना तो गाणे बदलत होता’ आणि जसा विराट अनुष्काची काळजी घेतो तसा काळजी घेत नव्हता. जेव्हा त्याचे खरे रंग समोर आले तेव्हा तिने त्याच्याबरोबर ब्रेकअप केले.
हेही वाचा – तुम्हाला मोमोज खायला आवडतात का? फॅक्टरीमध्ये कसा तयार होतो तुमचा आवडता पदार्थ, पाहा VIRAL VIDEO
मुलीने पुढे सांगितले की, जेव्हा तिच्या मैत्रिणीने बॉयफ्रेंड तिलाही विचारत असल्याचे सांगितले तेव्हा तिची फसवणूक करत असल्याचे समोर आले. तेव्हा ती तिच्या प्रियकराच्या १०वीच्या वर्गात गेली आणि त्याला जोरदार कानखाली लगावली. मुलीने लिहिले, ‘पण जेव्हा मी त्याला थप्पड मारली तेव्हा त्याच्या गालावर एक डास होता, जो माझ्या थप्पडमुळे मेला. दोन दिवस झाले आणि मला अजूनही स्वप्ने पडत आहेत की, त्या डासांचे एक कुटुंब बदला घेण्यासाठी आणि मला डेंग्यू देण्यासाठी एकत्र येत आहे. शेवटी ती म्हणाली खड्यात जा हर्षित(बॉयफ्रेंडचे नाव), करोलबागचे सर्व डास तुझ्या मागे लागू दे.”
हेही वाचा – मगरीजवळ जाणे तरुणाला पडले महागात; मगरीने अचानक हल्ला केला अन् जबड्यात…पाहा थरारक व्हिडीओ
नेटकऱ्यांनी दिल्या मजेशीर प्रतिक्रिया
पोस्टचा स्क्रीनशॉट X वर झेवियर अंकल नावाच्या अकांउटवर शेअर केला होता आणि तेव्हापासून त्यावर आश्चर्यकारकपणे मजेदार कमेंट येत आहेत. एका युजरने खिल्ली उडवली की, ”मी सर्व डासांना विनंती करतो की, त्याला त्रास देत रहा आणि कृपया थांबू नका.’