Delhi Floods : डोंगराळ भागात मुसळधार पावसाचा फटका राजधानी दिल्लीसह देशाच्या अनेक भागांना बसला आहे. अनेक शहरांमध्ये पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतीही हिच स्थिती झाली आहे. दरम्यान सोशल मीडियावर येथील पुरस्थितीचे अनेक फोटो व्हिडीओ समोर येत आहेत. पावसाने दिल्लीत लाल किल्ल्यापासून राजघाटापर्यंत पाणी साचले आहे. दरम्यान एका AI कलाकाराने (@vkspwr) दिल्लीच्या पुरस्थितीवरील आधारित काही AI फोटो तयार केले आहेत, ज्यामध्ये भविष्यात संपूर्ण दिल्ली पाण्यात बुडल्यास लोक कसे प्रवास करतील हे दर्शविले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिल्लीमध्ये पुरस्थिती

हथिनीकुंड बॅरेजमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे यमुनेच्या पाण्याची पातळी इतकी वाढली आहे की, गेल्या ४५ वर्षांचा विक्रम मोडला आहे. दिल्लीत यमुना नदीने धोका पातळीच्या चिन्हापेक्षा 3 मीटर वरून वाहत आहे. यावेळी यमुनेची पाण्याची पातळी २०८.६६ मीटरवर पोहोचली, त्यामुळे लाल किल्ल्यासह अनेक सखल भागात पाणी शिरले आहे. मात्र, आता हळूहळू पाण्याची पातळी कमी होत आहे. दिल्लीत यमुनेचे धोक्याचे चिन्ह 205 मीटर असून आता पाणी हळूहळू कमी होत आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये संपूर्ण दिल्लीत पूर आला तर लोक कसे प्रवास करतील हे दाखवण्यात आले आहे.

हेही वाचा – मुंबईच्या पावसात रस्त्यावर उतरली वॉटर कार, बस, ट्रेन अन् बाईक्स; AI ने तयार केलेली आधुनिक वाहने पाहून लोक म्हणाले….

दिल्लीतील पुरस्थितीच्या संकटावर एआयने शोधले उत्तर

दिल्लीतील पुरस्थितीच्या संकटाचा सामना करण्यासाठी एआयने उत्तर शोधले आहे. जर भविष्यात अशी पुरस्थिती झाल्यास त्यावर उपाय म्हणून पर्यायी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण केली आहे. व्हायरल एआय फोटोमध्ये तुम्हाला पूर्णपणे झाकलेल्या वॉटपबोटमधून नागरिक प्रवास करत आहेत. यामध्येतुम्ही लाल किल्ला आणि इंडिया गेट, राजपथसह राजधानी दिल्लीतील विविध ठिकाणे दिसत जिथे पाणी साचले आहेत. हे फोटो AI कलाकार विकास पनवार @vkspwr यांनी इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

हेही वाचा – दिल्ली मेट्रोत चक्क ब्रायडल लेहेंगा परिधान करुन फिरताना दिसली नववधू! नवरीवर खिळल्या प्रवाशांचा नजरा, पाहा Viral Video

अर्थात,फोटोमधील हे दृश्य सुंदर दिसत असले तरी प्रत्यक्षात पुरामुळे हजारो लोक हताश आणि बेघर झाल्याचे वास्तव आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi in future ai imagines dome boats sailing through delhi flooded streets snk