आजकाल एका क्लिकवर सर्व काही मिळत असल्यामुळे ऑनलाईन सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या अॅप वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही सेवा फायदेशीर असली तरी अनेकदा ग्राहकांना त्रासदायक अनुभव येत असतात. काही दिवसांपूर्वीच एका व्यक्तीने पनीर बिर्याणी मागावली पण त्यात चिकनचा तुकडा आढळला. त्यानंतर एका प्रग्नेंट महिलेने शाकाहारी जेवण मागवले आणि तिला मासंहारी जेवण मिळाले. नुकत्यात घडलेल्या या घटनांची चर्चा सुरु असतानाच आता नवीन प्रकरण समोर आले आहे.
गजेंद्र यादव यांनी त्यांच्या ऑनलाइन किराणा डिलिव्हरीच्या त्रासदायक अनुभवाची माहिती देणारी पोस्ट शेअर एक्सवर शेअर केली आहे. त्यांनी झेप्टो या ऑनलाइन किराणा ॲपवरून १० किलो गव्हाच्या पिठाची ऑर्डर दिली. पण ते फक्त आठ दिवसात उत्पादन कालबाह्य ( expire ) होणार आह असे समजले. १५ मे रोजी सोशल मीडियावर आपली निराशा शेअर करताना यादव यांनी इतक्या कमी वेळात एवढ्या मोठ्या प्रमाणात हे पीठ संपवण्याची अव्यवहार्यता अधोरेखित केली.
त्यांच्या पोस्टमध्ये, यादव यांनी उत्पादनाचा फोटो जोडला आहे आणि विनोदीपणे प्रश्न केला की, ते पीठ कालबाह्य होण्यापूर्वी ते कसे वापरायचे? पोस्टने त्वरीत लक्ष वेधून घेतले, बऱ्याच लोकांनी कमेंटही केल्या.
यादव यांनी पोस्टमध्ये लिहिले की,”@ZeptoNow अॅप वापरून Zepto कडून १० किलो गहू मागवला. एक्स्पायरी डेट ८ दिवसांनंतर आहे, ७ दिवसात १० किलो गहू कसा संपेल भाऊ?? इकडे या एकत्र संपवू या”
हेही वाचा – “सकल बन”, स्पेनच्या रस्त्यावर ओडीसी आणि भरतनाट्यम नृत्यांगणांमध्ये रंगली जुगलबंदी, सुंदर व्हिडीओ बघाच
येथे पोस्ट आहे:
झेप्टोने यादव यांच्या तक्रारीला प्रतिसाद दिला, त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि या समस्येचे निराकरण करण्यासाठी त्यांचे तपशील मागितले. मात्र, यादव यांचे समाधान झाले नाही. झेप्टोच्या एका प्रतिनिधीने त्याच्याशी संपर्क साधला होता परंतु आठवड्याभरात पीठ वापरण्याशिवाय दुसरा कोणताही उपाय देऊ केला नाही असेही यादव यांनी सांगितले.
प्रतिसादावर असमाधानी असलेले यादव यांनी कंपनीचे संस्थापक, आदित पलिचा आणि कैवल्य वोहरा यांना टॅग करून त्यांची तक्रार पुढे नेली. त्यांनी सुचवले की,”ग्राहक सेवा संघाला सामान्य ज्ञान आणि तर्कशास्त्राचे चांगले प्रशिक्षण आवश्यक आहे.”
त्याच्या तक्रारीला एक ट्विस्ट जोडून, यादव यांनी झेप्टोच्या संस्थापकांना उरलेले ७ किलो पीठ पाठवण्याचा प्रस्ताव ठेवला आणि समस्येचे निराकरणासाठी त्यांचे पत्ता दिला.
हेही वाचा –”दिल्ली खरंच कंटाळवाणे आहे!”, महिलेची पोस्ट वाचून संतापले दिल्लीचे लोक; दिले सडेतोड प्रत्युत्तर
पुढे यादव यांनी शेअर केले की, त्यांना पैसे परत करण्यासाठी कॉल आला होता आणि संस्थापकांना कदाचित त्यांच्या प्रस्तावाची माहिती मिळाली असावी.