आपल्यापैकी अनेकजण नोकरीसाठी वाहतूक कोंडीचां सामना करत रोज दीड-दोन तासांचा प्रवास करून ऑफिसला जातात. वाहतूक कोंडी इतकी वाढली आहे की ऑफिसला जाण्या येण्यासाठी रोजचे चार तास तिथेच वाया जातात. वाहतूक कोडींला कंटाळलेल्या नोकरदार वर्गासाठी घरात बसून लॅपटॉप किंवा पीसीवर काम करणे हे अनेकांचा स्वप्न आहे. कोरानापासून घरून काम करण्याची सुरु असलेली पद्धत आजही अनेक कंपन्यामध्ये सुरु आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची चिंता न करता, प्रवासामध्ये रोज दोन तास न वाया घालवता अनेकजण घरून काम करण्याचा आनंद घेतात. अनेकांना आपल्या कुटुंबियांबरोबर आपला मौल्यवान वेळ घालवता येतो.

delhi man says work from home with parents is like playing Squid Game X post divides Internet

“पालकांबरोबर घरून काम करणे म्हणजे ‘Squid Game’

“बंगळुरु किंवा मुंबई सारख्या शहरात जेव्हा तुमचा स्वतःचा आरामदायी फ्लॅट असेल तर घरून काम करण्यासारखी आनंदादायी गोष्ट दुसरी काही नाही. पण तुम्ही जर तुमच्या पालकांबरोबर राहत असाल आणि तुम्हाला घरून काम करायचे असेल तर तुम्हाला स्विड गेमसारख्या स्पर्धेत सहभागी झाल्यासारखे वाटेल” असे मत दिल्लीतील राहणाऱ्या एका तरुणाने एक्सवर व्यक्त केले आहे. पालकांबरोबर राहताना घरून काम करण्याबाबत शुभ याच्या पोस्ट वाचून एक्सवर नवा वाद पेटला आहे.. काहींनी शुभची बाजू घेत आपल्या पालकांना दोष दिला तर काहींनी कुटुंबजीवनाचा आदर करत पालकांबरोबर काम करण्याचा आनंद काय असतो याबाबत मत व्यक्त केले.

Paaru
Video : अनुष्का आदित्यच्या घरातील व्यक्तीचा अपघात घडवून आणणार? पारूला सत्य समजणार का? पाहा प्रोमो
Daily zodiac sign horoscope For 17 December 2024
१७ डिसेंबर पंचांग: १२ पैकी ‘या’ राशींचे प्रगतीच्या…
father son emotional video
“जेव्हा प्रेम आणि कर्तव्य दोन्ही समोर असतात”, मुंबईतील रेल्वेस्थानकावरील ‘हा’ VIDEO पाहून कळेल बापाची माया काय असते
Loksatta natyrang  Personality Suryacha Pille Three act play Directed
नाट्यरंग: सूर्याची पिल्ले; वटवृक्षावरील बांडगुळांची अर्कचित्रात्मक शोकांतिका
devmanus fame kiran gaikwad will get marry with vaishnavi kalyankar on 14 december
Video: मुहूर्त ठरला! ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाड ‘या’ दिवशी अडकणार लग्नबंधनात, मजेशीर व्हिडीओ शेअर करत तारीख केली जाहीर
scooter caught fire man urinated on it crazy video viral on social media
त्याने पॅंटची चेन उघडली अन्…, स्कूटरने पेट घेताच तरुणांनी काय केलं पाहा, VIDEO पाहून कपाळावर माराल हात
Paaru
Video: पारू व आदित्यच्या मैत्रीत फूट पाडण्यात अनुष्का यशस्वी होणार का? पाहा ‘पारू’ मालिकेचा प्रोमो
Dr Babasaheb Death Anniversary 2024
महामानवाला अभिवादन, दादरच्या चैत्यभूमीवर भीमसागर लोटला!
delhi man says work from home with parents is like playing Squid Game X post divides Internet

“WFH हे एक स्वप्न आहे जर तुमच्याकडे बंगळुरु, मुंबई किंवा अगदी दिल्ली सारख्या शहरात तुमचा स्वतःचा आरामदायी छोटा अपार्टमेंट असेल आणि तुमचा जोडीदारही तुमच्याबरोबर राहत असेल तर. तेच जर तुम्ही पालकांबरोबर राहत असताना जर घरून काम करत असाल तर हे स्क्विड गेमचे स्पर्धेचा संपूर्ण नवीन स्तर आहे,” असे मत त्याने आपल्या पोस्टमध्ये व्यक्त केले आहे. माहितीसाठी, स्क्विड गेम हा आकर्षक बक्षिसासाठी स्पर्धकांमध्ये रंगलेली जीव घेणी स्पर्धा दर्शवणारा एक कोरियन चित्रपट आहे. या स्पर्धेत एका पेक्षा थरारक खेळ दाखवले आहेत ज्यामध्ये एकापाठोपाठ एक स्पर्धक आपला जीव गमावतात. स्क्विड गेम सारख्या चित्रपटाची आईवडीलांच्या वर्तणुकीबरोबर तुलना करणे अनेकांना पटले नाही.

delhi man says work from home with parents is like playing Squid Game X post divides Internet

हेही वाचा – प्लिज, थांबवा हे आता”; मेट्रोमध्ये तरुणीने तमन्ना भाटियाच्या ‘आज की रात’ गाण्यावर केला डान्स, Viral Video पाहून संतापले नेटकरी

एक्सवर तरुणाच्या पालकांविरोधातील छोट्याशा तक्रारीने अनेकांचे लक्ष वेधले. अनेकांना या तरुणाचे मत पटले आणि नकळतपणे ऑनलाईन मिटिंगदरम्यान पालक कसे वागतात याबाबत अनेकांनी आपले किस्से सांगितले.

delhi man says work from home with parents is like playing Squid Game X post divides Internet

एका वापरकर्त्याने सांगितले”, मिटिंग सुरु असताना मागून आवाज येतो,”एका ग्लास पाणी दे ना बेटा, पंखा बंद कर, एक कप चहा कर,”

दुसऱ्याने सांगितले की, “माझे वडील एकदा क्लायंट कॉल दरम्यान आत आले आणि मोठ्याने म्हणाले, ‘त्यांना सांगा आम्ही व्यस्त(बिझी) आहोत, नंतर बोलू.’

वापरकर्त्यांपैकी एकाने पालकांच्या या वर्तणुक हा एक प्रकारचा छळ असे सांगताना म्हटले की,, “माझ्या आईच्या घरातून वर्षातून एकदा घरून काम करणे हा एक शुद्ध छळ आहे.”

delhi man says work from home with parents is like playing Squid Game X post divides Internet

सोशल मीडियावर सर्वांचे नकारात्मकत मत नव्हते अनेक वापरकर्ते कौटुंबिक जीवनाच्या रक्षणासाठी आवाज उठवला आणि शुभला “कृतघ्न” म्हणून संबोधले.

एका वापरकर्त्याने सांगितले की, “पालकांबरोबर असणे आणि त्यांच्याबरोबर राहणे ही खूप मोठं सुख आहे.”

दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटले, “आई-वडील, पत्नी आणि दोन वर्षांच्या मुलीसह घरून काम करताना मला माझा प्रत्येक मिनिट आवडतो.”

तुम्हाला काय वाटत? पालकांबरोबर राहताना घरून काम करणे आनंद आहे की छळ?

Story img Loader