Shocking video: बलात्काराच्या घृणास्पद आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना आपण पाहातो. आजोबाने नातवावर, वडिलांनी मुलीवर, काकाने पुतणीवर बलात्कार केल्याच्या घटना आपण नेहमी वाचतो. मात्र सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये दिल्लीतील कैलाश नगरमध्ये एका व्यक्तीनं चक्क मादी कुत्र्यांवर बलात्कार केलाय. देशभरात महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या बातम्यांनी मन खिन्न झालेले असतानाचआणखी एक धक्कादायक आणि किळस आणणारी घटना घडली आहे. माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य याठिकाणी घडले आहे.

वर्षानुवर्षे प्राण्यांवर होणाऱ्या अत्याचारांबद्दल आपण अनेकदा ऐकतो आणि तरीही अशा घटना कमी होण्याऐवजी वाढतच चालल्या आहेत. आपल्या स्वार्थासाठी निर्दयी माणसं प्राण्यांचा गैरवापर करतात आणि काही विकृत लोकं तर हद्दच पार करतात. सध्या असाच धक्कादायक प्रकार घडला आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.. आरोपीचे हे क्रूर कृत्य व्हिडीओमध्ये कैद झाले असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये त्यानं कुत्र्यावर लैंगिक अत्याचार केला एवढंच नाहीतर त्यानंतर त्यानं त्या कुत्र्याचे गुप्तांगही जखमी केले. याचा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

कुत्र्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या पुरूषाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. व्हिडिओमध्ये त्या पुरूषाचे गुप्तांग देखील दिसत आहेत. यानंतर स्थानिक आणि प्राणीप्रेमींनी या पुरूषाला मारहाण केली आणि नंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.

पाहा व्हिडीओ

Photo – एक्स अकाऊंट – vfanimals11

https://twitter.com/vfanimals11/status/1910321196106731833

सोशल मीडियावर एक्स हँडल “व्हॉइस फॉर अ‍ॅनिमल्स ११” ने पोस्ट केलेल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये, त्या माणसाला लोक मारहाण करताना आणि त्याला विचारताना दिसत आहे की, त्याने किती कुत्र्यांवर बलात्कार केला?त्या माणसाला लोकांनी मारहाण केली आणि त्याचे कपडे फाडले. एका संतप्त माणसाला त्याला “कितनो के साथ कर बेठा” असे विचारताना ऐकू येते, ज्याचा अर्थ असा होतो की, तू किती कुत्र्यांवर बलात्कार केलास? ज्याला तो सहा असं उत्तर देतो. दरम्यान, ज्या महिलेने पहिल्यांदा त्याला पाहिलं तिने दावा केला आहे की त्याने १३ कुत्र्यांवर बलात्कार केला.

गेल्या महिन्यात अशाच एका घटनेत, बेंगळुरूच्या जयनगरमध्ये एका विकृत व्यक्तीला एका भटक्या कुत्र्याचे लैंगिक शोषण करताना पकडण्यात आले. जो २३ वर्षांचा रोजंदारी कामगार आणि बिहारचा रहिवासी असल्याचे सांगितले जाते.