Viral Video : मेट्रोतील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. मेट्रोमध्ये कोणी कधी डान्स करताना दिसतात तर कधी कोणी गाणी म्हणताना दिसतात. एवढंच काय तर मेट्रोतील भांडणाचे व्हिडीओ सुद्धा व्हायरल होतात. सध्या मेट्रोमध्ये चोरीचे प्रमाण खूप वाढले आहे. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ समोर येतात. सध्या असाच एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये चालत्या मेट्रोमध्ये चोरटा तरुणाचा फोन हिसकावून पळताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तु्मच्याही अंगावर काटा येऊ शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हा व्हायरल व्हिडीओ चालत्या मेट्रोतील आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की मेट्रोच्या दरवाज्याजवळ उभा असलेला तरुण हातात असलेल्या मोबाईलमध्ये काहीतरी बघताना दिसत आहे. तितक्यात एक तरुण तिथे येतो आणि त्याला काहीतरी विचारतो. त्यावर तो काहीतरी सांगतो. पुढे स्टॉप येतो आणि मेट्रोचा दरवाजा उघडतो. मेट्रोचा दरवाजा जसा बंद होणार तितक्यात तो तरुण मोबाईल बघणाऱ्या तरुणाच्या हातचा मोबाईल हिसकावतो आणि बाहेर पळतो.

या तरुणाला त्या क्षणाला काहीही सुचत नाही. जेव्हा त्याला कळते की समोरच्या तरुण त्याचा फोन हिसकावून पळाला आहे तोपर्यंत मात्र दरवाजा बंद झालेला असतो आणि तो काहीही करू शकत नाही.हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. चोरटा मोठ्या हूशारीने वेळ साधून चोरी करताना दिसतोय. गेल्या काही महिन्यांमध्ये मेट्रोमध्ये अशा प्रकारच्या चोरीचे अनेक प्रकरणे समोर आली आहेत.

हेही वाचा : Optical Illusion : लपलेले ‘E’ अक्षर शोधून दाखवा, अर्धा तास घ्या तरीसुद्धा शोधू शकणार नाही…

ourdelhi.in या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, ” भावांनो नीट लक्ष ठेवावं” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “असे करू नका.” तर एका युजरने विचारलेय, “हा व्हिडीओ कोणी बनवला?” काही युजर्सनी लिहिलेय, “हा बनावट व्हिडीओ आहे.”