Delhi Metro: दिल्ली मेट्रो त्यात घडणाऱ्या घटनांमुळे कायमच चर्चेत असते. सातत्याने या ट्रेनमध्ये काहीनाकाही घटना घडत असतात.  मेट्रोचेही अनेक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत. जिथे लोक मेट्रोमध्ये विचित्र गोष्टी करत असतात. दिल्ली मेट्रोतलील कपलचेही व्हिडीओ वरचे वर व्हायरल होत असतात. सध्या दिल्ली मेट्रोचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जिथे चालत्या मेट्रोला आग लागली. मेट्रोचा प्रवास हा बऱ्याच जणांना सोयीस्कर वाटतो, त्यामुळे मेट्रो शहरातील लोक बहुतांशी मेट्रोने प्रवास करणे पसंत करतात. बऱ्याच अंशी मेट्रोही सुरक्षित मानली जाते. मात्र सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याला पाहिल्यानंतर तुमचे विचार नक्कीच बदलतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये मेट्रो धावताना दिसत आहे. तेवढ्यात स्फोटाचा आवाज ऐकू येतो. यानंतर धूर निघू लागतो. मेट्रोच्या छतावर आग दिसत आहे. स्फोटाचा आवाज ऐकून मेट्रो स्थानकाजवळ उभे असलेले प्रवासीही घाबरतात. याचा व्हिडीओ व्हायरल होत असून दिल्लीच्या उत्तम नगर मेट्रो स्टेशनचे असल्याचे सांगितले जात आहे. मेट्रोच्या वरच्या बाजूला असलेल्या ओव्हरहेड वायरला ही आग लागल्याचं दिसत आहे मात्र आग का लागली याचं आकरण अद्याप समोर आलेलं नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: तू लय बोलतेस का? पोपटाचं मालकिणीसोबत मराठीत भांडण; पाहा शेवटी कोण जिंकलं…

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ @ourdelhi.in नावाच्या पेजवरून इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. ज्याला आतापर्यंत जवळपास ६७ हजार लोकांनी लाईक केले आहे. या व्हिडिओवर लोकांकडून अनेक कमेंट येत आहेत. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. एका युजरवर कमेंट करताना त्याने लिहिले, ‘मेट्रो असुरक्षित वाटत आहे. तर दुसरा म्हणतो ‘असे विचित्र व्हिडिओ फक्त दिल्ली मेट्रोतच होऊ शकतात’. ‘दिल्ली मेट्रोत काय होईल याचा भरोसा नाही’, अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi metro catches fire incident video goes viral on social media srk