गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर दिल्ली मेट्रोमधले काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यात दिल्ली मेट्रोमधून ब्रा आणि मिनी स्कर्ट अशा टू-पीस आऊटफिटमध्ये एक तरुणी प्रवास करताना दिसते आहे. हे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताच नेटिझन्सनी या तरुणीची तुलना थेट उर्फी जावेदशी करुन तिच्या या पेहेरावावर टीका करायला सुरुवात केली. काही नेटिझन्सनी तिच्या पेहेरावाचं समर्थनही केलं. खुद्द या तरुणीनंही आपल्या कृतीचं समर्थन केलं असताना त्यावर आता थेट दिल्ली मेट्रोचं स्पष्टीकरण आलं आहे. यासंदर्भात जाहीर निवेदनच जारी करण्यात आलं आहे.

काय घडलं नेमकं?

मॉडेल व अभिनेत्री उर्फी जावेदच्या पेहेरावाचा मुद्दा महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा ठरला आहे. त्या पार्श्वभूमीवर दिल्ली मेट्रोतील या तरुणीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होऊ लागले. त्यासंदर्भात टीका होऊ लागली असताना या तरुणीने त्यावर खुलासा केला आहे. रिदम चन्ना असं या तरुणीचं नाव असून आपल्याला कपड्यांचं स्वातंत्र्य असल्याची भूमिका तिनं मांडली. “मी काय परिधान करायचं? हे माझं स्वातंत्र्य आहे. हे मी पब्लिसिटी स्टंट किंवा प्रसिद्धी मिळवण्यासाठी करत नाहीये. माझ्या कपड्यांबद्दल लोकांना काय वाटतं? याची मला पर्वा नाही. मी उर्फी जावेदचं अनुकरण करत नाहीये. माझ्या एका मित्राने अलीकडेच मला उर्फीचा फोटो दाखवला. तोपर्यंत उर्फी कोण आहे? हे मला माहीत नव्हतं”, असं रिदम म्हणाली आहे.

painkillers, addiction, Pune, Young woman arrested,
पुणे : वेदनाशामक औषधांचा नशेसाठी वापर, तरुणी अटकेत; औषधांच्या १६० बाटल्या जप्त
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Underground sewage Scheme , Sulabha Khodke ,
अमरावती : आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली… ‘हे’ आहे कारण
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
Algae found in ginger
महिलांनो तुम्हीही हिवाळ्यात जास्तीचं आले आणताय? एका महिलेला त्यात काय मिळालं पाहा; VIDEO पाहाल तर झोप उडेल
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Suspension of police, police indecent behaviour with girl,
पुणे : अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन
epileptic attack, youth epileptic attack, Pune,
पुणे : अपघातानंतर तरुणाला अपस्माराचा झटका, पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरेंच्या तत्परतेमुळे वैद्यकीय मदत

“माझे कुटुंबीय माझ्या कपड्यांच्या निवडीवर नाखूश आहेत. मला माझ्या शेजाऱ्यांकडून नियमित धमक्या मिळतात. पण लोक माझ्याबद्दल काय विचार करतात? याची मला पर्वा नाही”, असंही तिनं नमूद केलं.

यावरून वाद निर्माण झाल्यानंतर दिल्ली मेट्रोनं त्यावर जाहीर निवेदन करून प्रवाशांना डिसेंट कपडे परिधान करण्याचं आवाहन केलं आहे. “दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (DMRC)ला अपेक्षा आहे की मेट्रोनं प्रवास करणारे सर्व प्रवासी सामाजिक शिष्टाचारांचं पालन करतील. प्रवाशांनी अशी कोणतीही कृती करू नये किंवा असे कोणतेही कपडे परिधान करू नये, ज्यामुळे इतर प्रवाशांच्या भावना दुखावल्या जातील”, असं दिल्ली मेट्रोनं निवेदनात म्हटल्याचं वृत्त ‘द प्रिंट’नं दिलं आहे.

Viral Video: “गेल्या अनेक महिन्यांपासून…”, ‘ब्रा आणि मिनी स्कर्ट’ घालून प्रवास करणाऱ्या तरुणीचं स्पष्टीकरण

कायद्याचा दिला दाखला!

दरम्यान, हे आवाहन करताना दिल्ली मेट्रोनं निवेदनात दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन्स ऑपरेशन्स अँड मेंटेनन्स अॅक्टचा दाखला दिला आहे. या कायद्यानुसार, “असभ्य वर्तन हे कलम ५९ नुसार शिक्षेस पात्र आहे. आमचं सर्व प्रवाशांना आवाहन आहे की त्यांनी मेट्रोसारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या माध्यमातून प्रवास करताना शिष्टाचाराचं पालन करावं. पेहेरावाचं स्वातंत्र्य हा एक वैयक्तिक मुद्दा असून प्रवाशांनी त्याचं पालन करताना जबाबदार वर्तन ठेवणं आवश्यक आहे”, असंही दिल्ली मेट्रोनं नमूद केलं आहे.

Story img Loader