Delhi Metro Pregnancy Test : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. नेटकऱ्यांना हसवणारे असे मजेशीर व्हिडीओ, तर कधी भांडणाचे व्हिडीओ तसंच अपघाताचे व अश्लील प्रकारचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. यात दिल्ली मेट्रोतील व्हायरल झालेल्या व्हिडीओंची संख्या अधिक आहे.

दर दुसऱ्या दिवशी दिल्ली मेट्रोमध्ये काही ना काही लाजिरवाणा, किळसवाणा आणि अश्लील प्रकार घडत असतो. नागरिकांच्या सोयीसाठी असलेली ही दिल्ली मेट्रो आता सोशल मीडियावर इन्फ्लूएंसरच्या नावाखाली अश्लीलपणा करणाऱ्या तरुणांचा जणू अड्डाच झाली आहे. अशा व्हिडीओंमुळे अनेकदा कारवाई होऊनही हे सोशल मीडिया इनफ्लूएंसर्स यांची सार्वजनिक ठिकाणी अश्लील व्हिडीओ बनवून प्रसिद्धी मिळवायची संख्या वाढतच चालली आहे.

Mother love shocking video woman Went To Buy Milk for her baby And The Train Started Emotional Video
भुकेल्या बाळाला दूध आणायला उतरली आणि ट्रेन सुटली; पण तेवढ्यात घडला चमत्कार, VIDEO चा शेवट पाहून डोळ्यांत येईल पाणी
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Rape of a woman, lure of marriage, Pune, fraud,
पुणे : विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलत्कार, आरोपीकडून अधिकारी असल्याची बतावणी; ३८ लाखांची फसवणूक
Kanpur couple reels of romance on moving bike
Kanpur Couple Video: रिल बनविण्यासाठी कपलचं बाईकवर अश्लील कृत्य, व्हिडीओ व्हायरल होताच पोलीस ॲक्शन मोडवर
rasha thadani 12 th studies on set
Video : राशा थडानीने ‘आझाद’च्या सेटवर केला बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यास; व्हायरल व्हिडीओत अभिनेत्री म्हणाली, “१० दिवसांत…”
Mumbai Local Train Shocking video Womans Obscene Dance
मुंबई लोकलमध्ये तरुणीने ओलांडली मर्यादा! अश्लील कृत्य पाहून प्रवासी संतापले; VIDEO व्हायरल
Maharashtra need Chhatrapati Shivaji Maharaj
Video : महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे! तरुणीने कवितेतून सांगितले दु:ख; म्हणाली, “शिवराज्याचे फक्त धडे वाचले आम्ही…”
woman jumps from moving auto coz drunk driver took the wrong route in Bengaluru post viral on social media
चालत्या रिक्षातून महिलेने मारली उडी! दारूच्या नशेत ड्रायव्हरने तिला चुकीच्या ठिकाणी नेले अन्…; संतापजनक पोस्ट व्हायरल

हेही वाचा… Fire at petrol pump Viral Video: महिलेच्या धाडसाला सलाम! पेट्रोल पंपावर बाईक पेटली अन्…, अवघ्या १२ सेकंदात घडलं ‘असं’ काही

सोशल मीडियावर याआधी एका कपलचा व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यात ते कपल एकमेकांच्या तोंडात थुंकून कोल्ड ड्रिंक पित होते. आता पुन्हा एकदा याच कपलचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. प्रसिद्धीसाठी या कपलने दिल्ली मेट्रोमध्ये अश्लील प्रकार केला आहे.

व्हायरल व्हिडीओ (Delhi Metro Pregnancy Test Viral Video)

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत ही तरुणी तिच्या हातात प्रग्नेन्सी टेस्ट किट घेऊन कॅमेरात दाखवते. प्रग्नेन्सी टेस्टमध्ये दोन लाल रंगाच्या रेषा असल्याने ती प्रग्नेन्ट असल्याची शक्यता असते. ते टेस्ट किट तसंच हातात धरून तिच्या पार्टनरला ही बातमी द्यायला जाते. प्रग्नेन्सी टेस्ट पाहताच तरुण आनंदी होतो आणि तिला मिठी मारतो.

नेटकऱ्यांच्या कमेंट्स (Delhi Metro Pregnancy Test Users Comments)

हा व्हिडीओ ‘Ankit’ या एक्स (Delhi Metro Pregnancy Test) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “डिलिव्हरी पुढच्या स्टेशनला करा आता” असं कॅप्शन या व्हिडीओला दिलंय. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी यावर संताप व्यक्त करत प्रतिक्रिया दिल्या आहेत; तर काही जणांनी त्यांना ट्रोलदेखील केलं आहे. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “लाज नाही का वाटत यांना.” तर दुसऱ्याने लिहिलं की, “दिल्लीच्या मेट्रोमध्ये काहीही होऊ शकतं.”

हेही वाचा… पचनक्रिया सुधारण्यासाठी जेवणानंतर करा ‘या’ १० हस्त मुद्रा; आरोग्यासाठी ठरतील फायदेशीर

दरम्यान, याआधी अनेकदा हे कपल दिल्ली मेट्रो, सार्वजनिक ठिकाणी, उद्यानात अशाप्रकारचे अश्लील व्हिडीओ करताना दिसले आहेत.

Story img Loader